मुंबई : काहीवेळेला सोशल मीडियावर (social media) आपल्याला असे व्हिडीओ (trending video)पाहायला मिळतात की, त्यामध्ये अनेक व्यक्ती प्राण्यांच्यावरती अत्याचार करीत असतात. परंतु सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहिल्यानंतर अनेकांनी त्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे असे आपल्याकडे अनेकजण पाहतात. त्या व्हिडीओमध्ये (viral news in marathi) एक व्यक्ती उंटाला बिस्लेरीच्या बॉटलमधून पाणी पाजत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओ अनेकांनी चांगल्या कमेंट सुध्दा केल्या आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या बाजूला एक तहान लागलेला उंट बसला आहे. उन्हाचा तडाखा इतका लागत आहे. उंटाला पाण्याची गरज आहे. तुम्ही तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, त्या उंटाला किती तहान लागली आहे. उंटाला पाणी नाही मिळालं तर त्याचा मृत्यू होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी तिथून जात असलेल्या एका ट्रॅक्टर चालकाचं त्याच्याकडं लक्ष गेलं. त्यावेळी त्याने त्याकडे असलेलं पाणी उंटाला पाजलं. व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, एकदा पाणी पिल्यानंतर उंटाने काय केलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून लोकांनी चालकाचं जाम कौतुक केलं आहे.
आईएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केला आहे. उष्ण आणि गर्मीने तडफत असलेला हत्ती पाहायला मिळत आहे. अशावेळी फक्त ज्या लोकांना दया येते, अशीचं लोकं पाणी पाजू शकतात. सध्या देशात अनेक ठिकाणी उष्णता अधिक आहे. त्यामुळे पाण्याचे काही थेंब एखाद्याचा जीव वाचवू शकतो.
Drained by the heat, the camel was few minutes away from passing out. Kind driver gives water & revives it.
We are experiencing unexpected heat waves. Your few drops of water can save the lives of animals. Be compassionate to our fellow travellers . pic.twitter.com/daE7q9otdv
— Susanta Nanda (@susantananda3) June 11, 2023
व्हिडीओ अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे, काही लोकांनी देवाचा दुसरा अवतार असं देखील कमेंटमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ अजून व्हायरल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर झाला आहे.