बीजिंग : ऑफीसमधील कामासोबतच लोकांना सुट्टीही (leave) हवी असते. यामुळे मन आणि मेंदूला आराम मिळतो, त्यामुळे काम करायला मजा येते. असे अनेक अहवाल आहेत, ज्यात असे म्हटले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती सुट्टीनंतर ऑफिसमध्ये येते तेव्हा त्याची उत्पादकता (productivity) वाढते, म्हणजेच तो चांगले काम करतो. प्रत्येक कार्यालयात कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी (weekly off) दिली जाते, पण त्याशिवाय वर्षभरात अनेक सुट्ट्या असतात, त्याही ते घेऊ शकतात. पण बर्याच कंपन्यांमध्ये कर्मचार्यांना त्यांची सुट्टी (पगारी रजा) घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. परंतु तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की चीनमधील एका व्यक्तीला ऑफिसमधून 365 दिवसांची (365 days paid leave) सुट्टी मिळाली आहे आणि तीही सशुल्क म्हणजेच भरपगारी रजा.
साधारणत: खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकावेळी फक्त 10-15 दिवसांची पगारी रजा मिळते, पण जर कर्मचारी लग्नासाठी रजा घेत असेल, तर त्याची रजाही महिनाभर वाढवली जाऊ शकते. याशिवाय तुम्हाला प्रसूती रजेबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. प्रसूती रजेदरम्यान कंपन्या महिला कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांची रजा देतात आणि तीही पगारी रजा, पण एखाद्या व्यक्तीला थेट एक वर्षभरासाठी पगारी रजा मिळाल्याचे तुम्ही क्वचितच ऐकले असेल.
ऑफीसच्या पार्टीत लागला जॅकपॉट
खरं तर प्रकरण असं आहे की चीनच्या शेनझेनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या ऑफिसमध्ये पार्टी सुरू होती. ही त्या ऑफीसची वार्षिक पार्टी होती. यादरम्यान कर्मचाऱ्यांसाठी लकी ड्रॉही काढण्यात आला, ज्यामध्ये त्यांना कार्यालयीन सुट्टीसह विविध गोष्टी बक्षीस म्हणून मिळाल्या.
365 करू शकतो मजा आणि पगारही मिळत राहील
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशाच एका लकी ड्रॉमध्ये एका कर्मचाऱ्याचे नशीब उजळले. त्याला लकी ड्रॉमध्ये बक्षीस म्हणून 365 दिवसांची रजा मिळाली आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याच्या रजेचे पैसे कापले जाणार नाहीत. म्हणजेच काम न करता दर महिन्याला त्याच्या खात्यात पगार जमा केला जाईल. पण हे ऐकताच त्याच्या बॉसचा चेहराच पडला. हे बक्षीस कोणालाही मिळू शकेल , असे त्यांना वाटले नव्हते.
पण मॅनेजमेंटनेही याला दुजोरा दिल्याने त्या व्यक्तीला ही संपूर्ण रजा मिळू शकेल. तथापि, असे म्हटले जात आहे की आता कंपनी त्या कर्मचार्याला काही दिवसांसाठी लिव्ह एनकॅशमेंट ऑफर देऊ शकते, जेणेकरून ती व्यक्ती लवकरच कामावर परत येऊ शकेल.