Video | चालत्या मेट्रोचा दरवाजा ताकदीने उघडून माणसाने उडी मारली, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात…
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून अनेकांना घाम फुटला आहे. नेटकर्त्यांनी कमेंटच्या माध्यमातून त्या व्यक्तीला सल्ला दिला आहे. त्याचबरोबर काही लोकांनी अक्कल नसलेली व्यक्ती अशी कमेंट केली आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने मेट्रो ट्रेनचा (Metro Viral Video) दरवाजा उघडून बाहेर उडी मारली आहे. अनेक लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला असून विविध प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. ज्यावेळी त्या व्यक्तीने दरवाज्यातून उडी मारली, त्यावेळी घाबरलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. मेट्रोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मेट्रो ट्रेनला सगळ्या अत्याधुनिक व्यवस्था आहेत. त्यामुळे स्टेशन आल्याशिवाय कोणत्याही डब्याचा दरवाजा उघडत नाही. पण त्या व्यक्तीने ताकदीने तो दरवाजा उघडला आणि बाहेर पडला. ज्यावेळी त्या प्लॅटफॉर्मवरती उडी घेतली, त्यावेळी तो तोंडावर पडला. ही ज्यावेळी घटना घडली त्यावेळी एक महिला सहकारी व्हिडीओ ओरडली असल्याचा आवाज सुध्दा येत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून अनेकांना घाम फुटला आहे. नेटकर्त्यांनी कमेंटच्या माध्यमातून त्या व्यक्तीला सल्ला दिला आहे. त्याचबरोबर काही लोकांनी अक्कल नसलेली व्यक्ती अशी कमेंट केली आहे.
आतापर्यंत हा व्हिडीओ दहा मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. हाउ थिंग्स वर्क ट्विटर अकाऊंटवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 2 लाख 32 हजार लोकांनी त्या व्हिडीओ लाईक केले आहे. तो व्हिडीओ वारंवार पाहून लोकं कमेंट करीत आहेत.