VIDEO | माणसाने बाईकवर जुगाड करून पिठाच्या गिरणीचे मशीन बनवले, लोकांना इतके आवडले…
Jugaad Video | "माझ्या आईने मला हा व्हिडीओ पाठवला आहे. व्हिडीओतला व्यक्ती माझ्या घरी बाईकवरुन पिठाची मशीन (Atta Chakki Machine) घेऊन आला होता." सद्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर अनेक जुगाड व्हिडीओ (Jugaad Video) आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर ते व्हिडीओ (viral jugaad) लोकांना सुध्दा अधिक आवडतात. आतापर्यंत लोकांनी जुगाड केलेले अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्या लोकांनी जुगाड केला आहे, त्याचा फायदा सुध्दा लोकांना झाला आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती बाईकवरती (bike trending video) पिठाची मशीन (Atta Chakki Machine) घेऊन फिरत आहे. काही लोकांनी आतापर्यंत हेलिकॉप्टर तयार केलं आहे. तर काही लोकांनी घरी इलेक्ट्रीक बाईक तयार केली आहे.
आयएएस अधिकारी अवनीश शरण (IAS officer Awanish Sharan) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ त्यांना त्यांच्या आईने पाठवला आहे. जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मशीन कशापद्धतीने काम करीत आहे हे पाहायला मिळत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बाईकवरती असलेल्या मशीनसोबत उभी आहे. ज्या पद्धतीने हा व्हिडीओ पुढे जात आहे. त्यावेळी ती व्यक्ती त्या मशीनमध्ये मुठभरून धान्य टाकत आहे. काहीवेळात त्या मशीनमधून पीठ बाहेर यायला सुरुवात झाली आहे.
त्या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. ‘माझ्या आईने मला हा व्हिडीओ पाठवला आहे. हा व्यक्ती माझ्या घरी पिठाची चक्की घेऊन आला आहे.’
My mom sent me this video. This guy came to my home with this ‘Atta Chakki Machine.’
What an innovation. pic.twitter.com/bSnpcawgZR
— Awanish Sharan ?? (@AwanishSharan) June 9, 2023
त्या व्हिडीओला एक लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला चांगल्या प्रतिक्रिया सुध्दा आल्या आहेत. नवीन टेक्नॉलॉजी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर नवीन जुगाड लोकांना देखील आवडला आहे. सध्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.