VIDEO | बलवान माणसाने ओढला तब्बल 15 हजार किलोचा ट्रक, लोक त्याच्याकडे बघतचं राहिले
VIDEO | माणसाने दातांनी ओढला 15 हजार किलोचा ट्रक, गिनीज बुकमध्ये नाव नोंद, पाहा व्हिडीओ
मुंबई : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (VIDEO) होण्याचं प्रमाण सध्या अधिक झालं आहे. कारण आवडत्या व्हिडीओला अधिक पसंती मिळत आहे. त्याचबरोबर तो व्हिडीओ लोकं पुन्हा-पुन्हा पाहत आहेत. एक व्यक्ती दाताने 15 हजार किलोचा ट्रक (Truck) ओढत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे त्या व्यक्तीची गिनीज बुकमध्ये (Guinness World Records) नोंद झाली आहे.
अशरफ सुलेमान असं व्यक्तीचं नाव आहे. त्याने 15 हजार किलोचा ट्रक दाताने खेचल्यामुळे त्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडला असल्यामुळे लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
गिनीज बुकच्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर अशरफ सुलेमान याला शुभेच्छा सुध्दा देण्यात आल्या आहेत. लोकांनी अशरफ सुलेमान याला कमेंटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अभिनंदन सुध्दा केलं आहे.
View this post on Instagram
एक दोरी ट्रकला बांधली आहे, त्याचबरोबर एक दोरी अशरफ सुलेमान यांनी तोंडात पकडली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अशरफ सुलेमान यांच्या व्हिडीओला चार लाख 89 हजार लोकांनी पाहिले आहे. तसेच 26 हजार कमेंट आल्या आहेत.