Shocking Video:दाताने ओढल्या पाच कार; व्हिडिओ पाहून लोक चक्रावले

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक तरुण आपल्या दातांनी कार ओढण्याचा प्रयत्न दिसत आहे. ट्रॉय कॉनले-मॅग्नसन असे या तरुणाचे नाव आहे.

Shocking Video:दाताने ओढल्या पाच कार; व्हिडिओ पाहून लोक चक्रावले
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 6:44 PM

दातांचा उपयोग खाण्यासाठी आणि चेहऱ्याचा खुलवण्यासाठी असतो. मात्र, एका तरुणाने त्याच्या मजबूत दातांमुळे विश्व विक्रम रचला(Guinness World Records ) आहे. या तरुणाने तब्बल पाच कार दाताने ओढल्या आहेत(Man pulls five cars). कोणीतरी दातांनी गाड्या ओढत असल्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. मात्र, या तरुणाचा दाताने कार ओढतानाचा व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहेत.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक तरुण आपल्या दातांनी कार ओढण्याचा प्रयत्न दिसत आहे. ट्रॉय कॉनले-मॅग्नसन असे या तरुणाचे नाव आहे.

ट्रॉयने दाताने कार ओढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने तब्बल पाच कार ओढल्या आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर #guinnessworld records आणि #officiallyamazing यासह अनेक हॅशटॅगसह त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

कारला दोरी बांधून ती दोरी ट्ऱॉय दाताने ओढत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. कार ओढत असताना त्याच्या दातातून दोर निसटतो आणि तो धापकन खाली पडतो असेही या व्हिडिओत दिसत आहे. त्याच्या अनोख्या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने शेअर केलेल्या या व्हिडिओला 75,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओला 3,900 लाईक्सही मिळाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होत असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जात आहे.

ट्रॉय कॉनले-मॅग्नसन याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. या पूर्वी ट्रॉय याने दातांनी सर्वात वेगवान 20 मीटर हलके विमान ओढल्याचा विक्रम आहे. तसेच सर्वात जड वाहन 100 फूट वर ढकलल्याचा विक्रमही त्याने केला आहे. चॅरेटी संस्थांना मदत मिळावी म्हणून वेगवेगळ्या विक्रमांच्या माध्यमातून ट्रॉय पैसा गोळा करतो.

'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.