तो रेल्वे रुळांवर पथारी पसरुन डाराडुर झोपला, ड्रायव्हर हॉर्न वाजवून थकला, अखेर ब्रेक दाबला, काय आहे नेमकं प्रकरण

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती रेल्वे रुळांवर छत्री घेऊन तिच्या सावलीत झोपलेली दिसत आहे, इतक्यात ट्रेन तेथे आली....मग पुढे काय झाले ते वाचा.

तो रेल्वे रुळांवर पथारी पसरुन डाराडुर झोपला, ड्रायव्हर हॉर्न वाजवून थकला, अखेर ब्रेक दाबला, काय आहे नेमकं प्रकरण
train video viral-man Sleep on Railway Track
Follow us
| Updated on: Aug 26, 2024 | 12:25 AM

अनेक जण हल्ली प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा रिल्स काढून लाईक्स मिळविण्यासाठी ट्रेनच्या जवळ व्हिडीओ रिल्स बनवतात. काही लोकांचा तर रिल्स बनविताना रेल्वेने जर धडक दिल्याने काहींना आपल्या प्राणास गमवावे लागले आहे. तर काहींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. एक अशाच पद्धतीचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे की ज्यात रेल्वे रुळांवर एक व्यक्ती आरामात झोपल्याचे दिसत आहे. त्याला पाहून लोको पायलटने ट्रेन थांबविली आणि त्याला रुळांवर झोपलेल्या व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याला उठविले…

हा ताजा व्हिडीओ प्रयागराज येथील असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर पहुडलेला आहे.त्याला पाहून असे वाटत आहे की तो झोपलेला आहे. दरम्यान त्या वेळेत येथे ट्रेन येते. ट्रेनचा वेग कमी होता. त्यामुळे ट्रेनच्या लोको पायलटने ट्रेन वेळीच थांबविली. हॉर्न वाजवूनही ही व्यक्ती काही रुळांवरुन उठली नाही. तेव्हा लोको पायलटच ट्रेनच्या केबिनमधून उतरुन त्या व्यक्तीपर्यंत गेला आणि त्याला उठविले…

Man Sleep on Railway Track here see the post –

त्या व्यक्तीला हटविले ?

28 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये लोको पायलटला जेव्हा ट्रॅकवर कोणीतरी छत्री घेऊन झोपल्याचे दिसते. तेव्हा त्या व्यक्तीजवळ लोको पायलट जाऊन उभा राहिल्याचे व्हिडीओत दिसत आहे.मात्र. यानंतर नेमके काय झाले ते कळालेले नाही. रुळांवरील संबंधित ती व्यक्ती बरी असून त्याला तेथून हटविण्यात आल्याचे सांगण्यात येते. यानंतर ट्रेन पुढील प्रवासासाठी निघून गेली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर अनेक युजरच्या कमेंट येत आहेत. या व्यक्तीने देशी दारु प्यायली असावी त्याचाच परिणाम दिसत आहे.पटरीला उशी मानून हा आरामात झोपला कसा ? अशी प्रतिक्रीया एका युजरने व्यक्त केली आहे. या बहाण्याने लोको पायलटला देखील रिल्स बनविण्याची संधी मिळाली अशी प्रतिक्रीया अन्य एका युजरने व्यक्त केली आहे. तर अशाच कारणांनी ट्रेन लेट होत असतात आणि आपण रेल्वेच्या नावाने ओरडत असतात अशी प्रतिक्रीया दुसऱ्या एका युजरने दिली आहे. तर या प्रकरणाची चौकशी झाली पाहीजे. हा व्यक्ती येथे का झोपला. याच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी एका युजरने केलेली आहे. कदाचित त्याला झोपतेच आत्महत्या करायची असेल, अखेर कोण अशा प्रकारे रेल्वे रुळांवर झोपेल असेल अशी प्रतिक्रीया एका युजरने व्यक्त केली आहे.जर ही व्यक्ती नशेत असली तरी त्याच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी सोशल मिडीयावर होत आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.