Leopard viral video : सोशल डिस्टन्सिंगचं पालन ‘इथं’ही गरजेचं, अन्यथा जीवही जाऊ शकतो!
Wild Animals : एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. एका बिबट्याला (Leopard) झुडपांच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी पिंजऱ्यात कैद केले आहे. तर एक व्यक्ती त्याला त्रास देत आहे. त्याचवेळी धक्कादायक घडते.
Wild Animals : शिकारी प्राणी पिंजऱ्यात बंद असला तरीही तो नेहमीच शिकारी राहतो. तो कधीही आपली आक्रमक शैली बदलत नाही. प्राणीसंग्रहालयात अनेकजण वन्य प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी जातात, मात्र काही वेळा त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे मोठ्या अपघाताला बळी पडतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पिंजऱ्यात बंद वन्य प्राण्याला साधे समजून त्याला त्रास देत आहे आणि त्यानंतर त्याच्यासोबत जे घडले ते खरोखरच धक्कादायक होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एका बिबट्याला (Leopard) झुडपांच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी पिंजऱ्यात कैद केले आहे. यादरम्यान एक व्यक्ती हातात लाकूड घेऊन त्याच्याकडे येतो आणि पिंजऱ्यात टाकून त्याला टोचू लागतो. मात्र बिबट्या दाताने लाकूड पकडतो आणि त्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो.
‘बिबट्याला येतो राग’
बिबट्यासोबत त्या व्यक्तीच्या या कृतीमुळे बिबट्याला राग येतो आणि तो त्या व्यक्तीला जोरात पिंजऱ्याकडे ओढतो. पिंजऱ्याजवळ पोहोचताच ती व्यक्ती जोरजोरात ओरडू लागते. मात्र तिथे उपस्थित असलेल्या अन्य एका व्यक्तीने त्याला वाचवले. अशा प्रकारे त्या व्यक्तीचा जीव वाचतो. अन्यथा बिबट्याने त्याचा जीव घेतला असता. हा व्हिडिओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले, “Instant karma… see till the end..’ वन्य प्राण्यांच्या जवळ कधीही जाऊ नका, विशेषतः जेव्हा ते आक्रमक असतात.
‘कोणाला त्रास देण्याआधी शंभर वेळा विचार करेल’
या व्हिडिओला 34 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून लोक या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूझरने खिल्ली उडवत लिहिले, की या घटनेनंतर आता ही व्यक्ती आयुष्यभर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करेल. त्याचवेळी आणखी एका यूझरने लिहिले, की पुढच्या वेळी कोणाला त्रास देण्याआधी शंभर वेळा विचार करेल. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
Instant karma… see till the end. Never get close to wild animals. And particularly when they are in stress. pic.twitter.com/Br5m3Uml1P
— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 4, 2022
आणखी वाचा :