उकळल्या धातूमध्ये पुन्हा पुन्हा घालतोय हात; व्हिडिओवर Elon Musk यांनी केली कमेंट, म्हणाले…
Elon Musk comment on old video : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांनी सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Video) होत असलेल्या एका जुन्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
Elon Musk comment on old video : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांनी सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Video) होत असलेल्या एका जुन्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर घरी प्रयत्न करू नका, असे त्यांनी सांगितले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वितळणाऱ्या धातूला हाताने स्पर्श करताना दिसत आहे. लावासारख्या गरम वितळलेल्या धातूला स्पर्श करूनही त्या व्यक्तीच्या हाताला काहीही लागत नाही. हा व्हिडिओ ट्विटरवर सायन्स गर्ल नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वितळणाऱ्या धातूला हाताने स्पर्श करताना दिसत आहे. तो माणूस ज्वलंत धातूला दोनदा स्पर्श करतो आणि नंतर कॅमेराला हात दाखवतो, की तो जळाला नाही. हा व्हिडिओ 3.6 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्यावर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मस्क यांनी केले आवाहन
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एलन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना त्यांनी लोकांना हा स्टंट करू नये, असे आवाहन केले आहे. मस्क यांनी ट्विटरवर लिहिले आहे, की हे घरी करून पाहू नका. त्यांच्या या कमेंटला अनेकांनी लाइक केले आहे. लावासारख्या उकळत्या धातूला स्पर्श करूनही हात न जळण्यामागे कोणताही चमत्कार नसून त्यामागे एक शास्त्र आहे, ज्याला लीडेनफ्रॉस्ट इफेक्ट म्हणतात.
A really dramatic example of the Leidenfrost effect
the moisture on his skin boils instantly, forming a layer of steam that insulates for a very short time, a temporary barrier between this person and the molten metal pic.twitter.com/USwGCRlj5Q
— Science girl (@gunsnrosesgirl3) March 29, 2022
2018मध्ये पहिल्यांदा झाला होता व्हायरल
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे, की व्यक्तीच्या हाताच्या त्वचेवरील ओलाव्यामुळे थोड्या काळासाठी वाफेचा थर तयार होतो, ज्याने वितळलेल्या धातू आणि व्यक्तीच्या त्वचेमध्ये तात्पुरता अडथळा निर्माण करून त्याला जळण्यापासून वाचवते. हा व्हिडिओ 2018मध्ये पहिल्यांदा शेअर करण्यात आला होता, परंतु एलन मस्क यांनी यावर कमेंट केल्यानंतर तो पुन्हा व्हायरल होत आहे.
A really dramatic example of the Leidenfrost effect
the moisture on his skin boils instantly, forming a layer of steam that insulates for a very short time, a temporary barrier between this person and the molten metal pic.twitter.com/USwGCRlj5Q
— Science girl (@gunsnrosesgirl3) March 29, 2022