Viral Video : दारूसाठी जीवाचा आटापिटा, माणसाचे देशी जुगाड एकदा पाहाच

सध्या एका माणसाच्या डोकॅलिटीचा मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. या माणसाने दारूच्या बॉटलचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून जबरदस्त डोकं लावलं आहे. (man save liquor from water)

Viral Video : दारूसाठी जीवाचा आटापिटा, माणसाचे देशी जुगाड एकदा पाहाच
viral video
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 7:29 PM

मुंबई : सोशल मीडियाचं विश्व हे मोठं व्यापक आहे. या मंचावर कधी काय समोर येईल हे सांगता येत नाही. यातील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. सध्या एका माणसाच्या डोकॅलिटीचा मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. या माणसाने दारूच्या (liquor) बॉटलचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून जबरदस्त डोकं लावलं आहे. (man used trick to save liquor from water goes viral on social media)

दारुच्या संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड

या जगात जुगाडू लोक बरेच आहे. त्यांची जुगाडू वृत्ती पाहून अनेकवेळा आपण अवाक् होतो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओसुद्धा असाच काहीसा आहे. या व्हिडीओमध्ये जवळ असलेल्या दारूला पाण्यापासून वाचवण्यासाठी एका माणसाने चांगलंच डोकं वापरल्याचं दिसतंय. व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे एक माणूस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जातोय. मात्र, या रस्त्यावर बरेच पाणी साचले आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जायचे म्हटल्यावर पाण्यातून जावे लागणार आणि पाण्यातून गेलं तर अंग भिजणे हे आलेच. सोबतच जवळ दारुच्या बॉटल असल्यामुळे त्यासुद्धा सुरक्षित ठवणे या माणसासाठी महत्त्वाचे आहे.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी बकेटचा वापर

याच गोष्टींचा विचार करुन व्हिडीओतील माणसाने चांगलंच डोकं वापरलं आहे. त्याने प्लास्टिकच्या दोन बकेट्सचा वापर केलाय. या बकेट्समध्ये त्याने जवळ असलेल्या दारुच्या बॉटल ठेवल्या आहेत. तसेच बकेटमध्ये पाय टाकून तो पाण्यातून चालताना दिसतोय. शेवटी रस्ता ओलांडल्यानंतर या माणसाने बकेटमधून पाय पाढले आहेत. तसेच दारूच्या बॉटलसुद्धा काढल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून उत्स्फूर्तपणे व्यक्त होत आहेत. अनेकजण या माणसाच्या डोकॅलिटीची वाहवा करत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ ‘Shwetank’ या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्डिडीओवर लोक मजेदार कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

खाकी वर्दीचे असेही रूप, म्हाताऱ्या महिलेला प्रेमाने भरवला घास, फोटो व्हायरल

Viral Video : भरधाव वेगानं धावणारी वाहनं अन् अचानकपणे महामार्ग खचला, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Video | राजाचा आपल्या राणीसोबत विहार, वाघाची भारदस्त चाल पाहून नेटकरी अवाक्

(man used trick to save liquor from water goes viral on social media)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.