मुंबई : जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (International Women’s Day 2021) म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर जगभरात आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Many Political leaders wish International Women’s Day 2021)
मुख्यमंत्र्यांकडून महिला दिनाच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, हा दिन महिलांप्रती ऋण व्यक्त करण्याचा, किंवा कर्तव्याचा भाग म्हणून नाही. तर आपण जे काही आहोत, त्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात आयुष्यात धैर्याने साथ सोबत करणाऱ्या शक्तीला वंदन करण्याचा दिन आहे. महाराष्ट्राला शूर, कर्तबगार, समाजसुधारक, विचारवंत महिलांची मोठी परंपरा आहे. त्यामध्ये माँसाहेब जिजाऊ महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, ताराराणी, क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्यासह अनेकांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करावे लागेल, त्यांना या निमित्ताने वंदन करावे लागेल. पण त्यांचा वारसा चालवणाऱ्या आताच्या काळातील महिलांनाही वंदन करावे लागेल.
विशेषतः गेले वर्षभर कोरोना विरोधातील लढा सुरु आहे. तो अजूनही संपलेला नाही. या लढ्यात घरा-घरात महिलांनी न डगमगता, सगळ्यांना आधार दिला. कोविड योद्धा म्हणूनही आशा सेविका, परिचारिका अशा विविध जबाबदाऱ्या धैर्याने पार पाडल्या. त्यांचे हे योगदान इतिहास विसरू शकणार नाही. अशा कठीण काळात धैर्याने जबाबदारी घेणाऱ्या स्त्रीशक्ती, मातृ शक्तीला जपणे, त्यांना सुरक्षित ठेवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्र सुरक्षित आहेच, पण आणखी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची शपथ घेऊ या. महिलांच्या दृष्टीकोनातून विविध क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध होऊ या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
अजित पवारांकडून सर्व स्त्रीशक्तीला वंदन
तर अजित पवार यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त समस्त स्त्रीशक्तीला वंदन करत राज्यातील माता-भगिनी आणि बंधूंनाही ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाचा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वाचा वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे नेण्याचं काम आपण सर्वजण करत आहोत. महाराष्ट्रातील स्त्रीशक्ती हा वारसा अधिक समर्थपणे, यशस्वीपणे पुढे नेत आहे याचा आपल्या सर्वांना आनंद, अभिमान आहे.
महाराष्ट्राच्या गाव-खेड्यात राहणाऱ्या, शेतामध्ये कष्ट करणाऱ्या, शहरांमध्ये नोकरी, उद्योग, व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या समस्त माता-भगिनींच्या त्यागाचे स्मरण करून, राष्ट्रनिर्मितीतील स्त्रीशक्तीच्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील स्त्रीशक्तीला त्यांचा हक्क, मान-सन्मान, सुरक्षित वातावरण देण्याचा आपण सर्वांनी निर्धार करूया, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
Saluting our indomitable #NariShakti on International Women’s Day! India takes pride in the many accomplishments of the women of our nation. It is our Government’s honour to be getting the opportunity to work towards furthering women empowerment across a wide range of sectors.
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2021
महिलांचे स्थान त्यांचे योगदान लक्षात ठेवणे समाजाच्या सर्वंकष प्रगतीसाठी आवश्यक म्हणूनच महिलांचा सर्वच क्षेत्रांमधील सहभाग सुरक्षित वावर यासाठी प्रयत्न होणे गरजेचे निव्वळ #जागतिकमहिलादिन पुरतीचया विषयावर चर्चा होणे अपेक्षित नसून ती समाजाची कायमस्वरूपी जबाबदारी आहे#HappyWomensDay pic.twitter.com/G13KRbhuvF
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 8, 2021
Calm,
Capable,
Confident,
Courageous,
Compassionate,
a woman is everything a society needs to excel.#InternationalWomensDay pic.twitter.com/8vKXEnq30c— Congress (@INCIndia) March 8, 2021
जागतिक स्तरावर आज महिला दिन साजरा केला जात आहे. महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत.यशस्वी होत आहेत,ही आश्वासक बाब आहे. या महिला दिनी लिंगसमभावाचे तत्व समाजात रुळावे ही अपेक्षा. सर्वांना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.#WorldWomensDay pic.twitter.com/nys7wdYNTb
— Supriya Sule (@supriya_sule) March 8, 2021
स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य…
स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व…
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा! pic.twitter.com/6GTHqfya3A— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) March 8, 2021
नारी शक्ति के अदम्य साहस, सम्मान, समानता, सुरक्षा, सहभागिता और सशक्तीकरण के लिये समर्पित #अंतरराष्ट्रीय_महिला_दिवस के अवसर पर समस्त देश व प्रदेशवासियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।#HappyWomensDay2021 #InternationalWomensDay2021 pic.twitter.com/8BzO5cXAUH
— Babita Phogat (@BabitaPhogat) March 8, 2021
She doesn’t follow the crowd, rather she makes the crowd follow –#HappyWomensDay #womenempowerment #womenpower
दुनियाभर की स्त्री-शक्ती को बहुत सारा प्यार और प्रणाम ❤
हम खुद हमारी सबसे बड़ी ताकत है ??✊#महिलादिवस #महिला_दिवस #स्त्रीशक्ती #अंतर्राष्ट्रीय_महिला_दिवस pic.twitter.com/4QDM85cxOJ— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) March 8, 2021
गृहमंत्री @AnilDeshmukhNCP साहेबांनी पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. pic.twitter.com/yqoxMRLEvL
— Office of Anil Deshmukh (@OfficeofAnilD) March 8, 2021
(Many Political leaders wish International Women’s Day 2021)