भारतातील मुलाचा पाकिस्तानातील मुलीवर जडला जीव; फोटो व्हायरल होताच, लोकं म्हणाली…
कदाचित 2004 मध्ये मैं हूं ना हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये भारत आणि पाकिस्तानाचे संबंध दाखवण्यासाठी प्रोजेक्ट मिलाप दाखवण्यात आला होता.
नवी दिल्लीः एका भारतीय मुलाचा आता पाकिस्तानी मुलीवर जीव जडला आहे. त्यामुळे आता दोघांचाही साखरपुडा करण्यात आला आहे. या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुलीच्या बहिणीने त्या दोघांचा फोटा आता ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोलाही ट्विटरवर अनेक जणांनी प्रतिसाद देत अनेक तो फोटो शेअर केला आहे. भारतीय मुलगा आणि पाकिस्तानी मुलीचा हा फोटो मिशल नावाच्या एका मुलीने ट्विटरवर शेअर केला आहे. तो फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे की, तिच्या बहिणीने एका भारतीय मुलाबरोबर विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.
याबरोबरच मिशालने केकचाही फोटो शेअर केला आहे. त्या केकवर लिहिले आहे की, प्रोजक्ट मिलाप की शुरुआत होत गई है. हे तिने लिहिले आहेच मात्र त्यात वेळी तिने हेही लिहिले आहे की, या विषयावर आता आणखी कोणतीही चर्चा तिला करायची नाही.
my sister just got engaged to her indian boyfriend so you know we had to address the elephant in the room somehow pic.twitter.com/U25RxcJhco
— Mishal (@mishalengelo) February 19, 2023
मिशालने या दोघांच्या फोटोबरोबरच अनेकांचे ट्विटही शेअर केले आहेत. तिने एका ट्विटमध्ये असाही दावा केला आहे की, ती एका गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत आहे की, या दोघांचं लग्न हे वाघा बॉर्डर होण्यासाठी प्रयत्नशील आहे. मिशालने हेही सांगितले आहे की, या दोघांचं लग्न व्हावं म्हणून मी अनेक लोकांना संपर्क साधत आहे.
फॉलोअप ट्विटमध्ये मिशालने म्हटले आहे की, कुणी प्रोजक्ट मिलापबद्दल माहिती करुन घेत असेल तर त्यांनी स्वतः याबद्दल शिकण्यासारखे आहे असंही त्यांनी म्हटले आहे.
कदाचित 2004 मध्ये मैं हूं ना हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये भारत आणि पाकिस्तानाचे संबंध दाखवण्यासाठी प्रोजेक्ट मिलाप दाखवण्यात आला होता.
चित्रपटात शाहरूख खान, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी, जायद खान, अमृता राव, नसीरुद्दीन शाह, किरण खेर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या
मिशालने 19 फेब्रुवारी रोजी एक ट्विट केले होते, त्या ट्विटला 3 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते. तर 4 हजारपेक्षा जास्त लोकांनी ते ट्विट लाईक केले होते. तर अनेक युजर्सनी या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत.
तर काहींनी सगळ्यात सुंदर जोडी म्हणून त्यांचे कौतूक केले आहे. तर एका यूजरने लिहिले आहे की, जगात एकीकडे असं होत असतानाच दुसरीकडे मात्र माझे वडील आमच्या जातीबाहेरचा बॉयफ्रेंडला घरचे तयार नाहीत तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, माझं पण असंच काहीसं आहे, मेरा क्रशबी पाकिस्तान में है असं म्हणत अनेक भावभावना शेअर केल्या आहेत.