Liquor : हेच पृथ्वीतलावरील मद्यराष्ट्र! येथे भरते मयशाळा, दारु रिचविण्यात हा देश सर्वात पुढे, भारताचा क्रमांक कितवा?
Liquor : अर्थव्यवस्था दारुड्याने सॉरी मद्यप्रेमींनीच सावरल्याचे गंमतीने बोलल्या जाते. जगात कोणत्या देशात सर्वाधिक दारु रिचवल्या जाते माहिती आहे का?
नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेचा भार मद्यप्रेमींच्या (Drinker) खाद्यावर असतो, असे अनेकदा गंमतीने म्हटले जाते. कारण दारुवरील (Liquor) करातून शासनाला मोठा महसूल मिळतो. सरकारच्या तिजोरीत मोठी रक्कम येऊन पडते. दारु सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करत असले तरी महसूलाचा (Income) मोठा हिस्सा मद्यातूनच येतो, हे वेगळं सांगायला नको. पण तुम्हाला माहिती आहे का, जगात सर्वाधिक दारु कुठे, कोणत्या देशात रिचवल्या जाते ते? तुम्हाला वाटतं असेल की दारु रिचविण्यासाठी अर्थातच मोठी लोकसंख्या असलेल्या देशाचा क्रमांक सर्वात समोर असेल तर हा अंदाज चुकीचा आहे. कारण या देशाचे नाव कदाचित अनेक लोकांनी पहिल्यादांच ऐकले असेल.
ही आहेत मद्यराष्ट्र
हे सुद्धा वाचा
- दारु रिचविण्यात सर्वात अग्रेसर आहे सेशल्स हा देश. हा आफ्रिकन खंडातील देश आहे. 115 बेटांचा मिळून हा देश आहे. या देशात वार्षिक प्रति व्यक्ती 20.5 लिटर मद्य रिचवतो. हे अत्यंत सुंदर बेटांचा देश आहे. या देशात पर्यटक आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळेच हे मद्यराष्ट्र म्हणून ओळखले जाते.
- Worldranking.com नुसार, या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पण आफ्रिकन राष्ट्राचं आहे. युगांडा हा देश या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या देशात 15.9 लिटर दारु प्रत्येक व्यक्ती रिचवत असल्याचा दावा करण्यात येतो.
- या यादीत तिसऱ्या क्रमांकावर चेक रिपब्लिक आहे. या ठिकाणी वार्षिक प्रति व्यक्ती 14.45 लिटर दारु पिते. हे युरोपातील छोटे राष्ट्र आहे. पोलंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोवाकिया या दरम्यान हे राष्ट्र आहे.पर्यटकांसाठी हे राष्ट्र एक पर्वणीच आहे.
- बाल्टिक राष्ट्रांपैकी एक असलेले लिथुआनियाचा मद्यराष्ट्रांमध्ये चौथा क्रमांक लागतो. लिथुआनिया, लातविया आणि एस्तोनिया या तीन राष्ट्रांचा समूह बाल्टिक राष्ट्र म्हणून ओळखण्यात येतो. लिथुआनियात प्रति व्यक्ती एका वर्षात 13.22 लिटर दारु पिते.
- लक्झेंबर्ग हा युरोपातील देश आहे. जगातील प्रगत राष्ट्रांपैकी हा एक देश आहे. सधन देशांमध्ये हा देश मोडतो. युरोपियन राष्ट्रांचा भाग असलेला हा देश सर्वात प्रगत देश आहे. या देशातील नागरिक वार्षिक 12.94 लिटर दारु रिचवते. या देशाचा पाचवा क्रमांक लागतो.
- सर्वाधिक दारुची विक्री होणाऱ्या राष्ट्रात जर्मनीचा क्रमांक 6 वा आहे. या देशात प्रति व्यक्ति 12.91 लिटर दारु पिते. प्रवाशी कामगारांसाठी, नोकरदारांसाठी जर्मनी हे आवडते शहर आहे. या देशात बाहेरील देशातील अनेक नागरिक स्थायिक होत आहेत. हे प्रमाण वाढत आहे.
- आर्यलँड या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. या देशात वार्षिक प्रति व्यक्ती 12.88 लिटर दारु पितात. तर आठव्या क्रमांकावर बाल्टिक राष्ट्र लातविया याचा क्रमांक लागतो. या देशातील प्रत्येक नागरिक वार्षिक जवळपास 12.77 लिटर दारु पिते.
- युरोपातील स्पेनमधील नागरिक पण मद्यप्रेमी आहेत. या देशात वार्षिक आधारावर प्रति व्यक्ती 12.72 लिटर दारु पिते. या देशाचा मद्यराष्ट्रांच्या यादीत 9 वा क्रमांक लागतो. दहाव्या क्रमांकावर बल्गारिया हा देश आहे. या देशात प्रति व्यक्ती वार्षिकरित्या 12.65 लिटर दारु सहज रिचवते.
- आता या यादीत भारताचा कितवा क्रमांक असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या यादीत भारताचा क्रमांक सर्वात मागे आहे. भारताचा 103 क्रमांकावर आहे. भारतात वार्षिक प्रति व्यक्ती 5.54 लिटर दारु रिचवते.