Viral : ‘मला खरं प्रेम मिळालं’ म्हणत कोट्यवधीचा मालक करणार 30 वर्ष लहान मुलीशी लग्न!

Millionaire old man married fourth time : अमेरिकेत राहणारा 51 वर्षीय करोडपती ब्रँडन वेड (Brandon Wade) चौथ्यांदा लग्न करणार आहे. 21 वर्षीय डाना रोझवाल (Dana Rosewall) त्यांची चौथी पत्नी असेल. ब्रँडन एक डेटिंग वेबसाइट (Dating Website) चालवतात.

Viral : 'मला खरं प्रेम मिळालं' म्हणत कोट्यवधीचा मालक करणार 30 वर्ष लहान मुलीशी लग्न!
ब्रँडन वेड आणि डाना रोझवालImage Credit source: PA Real Life
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 1:47 PM

Millionaire old man married fourth time : अमेरिकेत राहणारा 51 वर्षीय करोडपती ब्रँडन वेड (Brandon Wade) चौथ्यांदा लग्न करणार आहे. 21 वर्षीय डाना रोझवाल (Dana Rosewall) त्यांची चौथी पत्नी असेल. ब्रँडन एक डेटिंग वेबसाइट (Dating Website) चालवतात. या वेबसाइटवर त्यांची आणि रोसवेलची भेट झाली. काही दिवसांनंतर दोघेही प्रेमात पडले आणि त्यांची एंगेजमेंट झाली. आता हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ब्रँडन वेड म्हणतात, की त्यांना डाना रोसवेलच्या रुपाने खरे प्रेम मिळाले आहे आणि आता ते तिच्यासोबत आपले उर्वरित आयुष्य घालवणार आहेत. ‘प्रेम या संकल्पनेचा शोध गरिबांनी लावला’ असे त्यांनी एकदा प्रेमाबद्दल सांगितले होते, पण आता ते रोझवेलला त्यांचे खरे प्रेम सांगत आहेत. ब्रँडन वेड आणि डाना रोसवेल यांच्या वयात 30 वर्षांचे अंतर आहे. 2020च्या अखेरीस भेटल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा विचार केला होता.

घटस्फोट न देण्याची शपथ

‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, ब्रँडनने रोसवेलला घटस्फोट न देण्याची शपथ घेतली आहे. ब्रँडनची शेवटची तीन लग्ने तुटली आहेत. ब्रँडनच्या आयुष्‍यात अनेक गर्लफ्रेंड आल्या, परंतु ते कोणाशीही फार काळ टिकून राहिले नाही. ब्रँडन म्हणाले, की तीन विवाह मोडल्यानंतर, अनेक स्त्रिया जोडीदार बनल्या परंतु रोसवेलला भेटेपर्यंत त्यांना प्रेम मिळाले नाही. ते म्हणाले, की रोझवेलने माझा दृष्टीकोन बदलला आहे.

ऑनलाइन डेटिंग कंपनीचे संस्थापक

ते म्हणाले, ‘माझे आणि रोझवेलचे प्रेम शाश्वत, कालातीत आणि या आयुष्याच्या पलीकडे आहे.’ ब्रँडन यांच्या म्हणण्यानुसार, ‘आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा आमच्या दोघांनाही लग्न करायचे नव्हते. पण आता आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण शेवटी प्रेम म्हणजे काय हे आपल्याला समजले आहे. करोडपती ब्रँडन वेड हे अमेरिकन व्यापारी आहेत. ते InfoStream Group ऑनलाइन डेटिंग कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पूर्वी ते सॉफ्टवेअर इंजिनिअर होते.

आणखी वाचा :

…तर ‘अशी’ करायचा Bullet bike चोरी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, पाहा Viral video

#Himveers : कबड्डी… कबड्डी… कडाक्याच्या थंडीत ITBP जवानांचा रंगला खेळ, Video viral

‘एक और प्रयास’की जरूरत, ‘या’ चिमुकलीचा Video पाहा; Skating करताना कितीवेळा पडली, पण…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.