Viral Video: मानवी वस्तीमध्ये शिरला महाकाय सरडा, व्हिडीओ पाहून नेटकरी चकित

व्हिडीओमध्ये एक महाकाय सरडा थेट मानवी वस्तीत घुसल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ पाहून अनेकजण अवाक झाले आहेत. (monitor lizard viral video)

Viral Video: मानवी वस्तीमध्ये शिरला महाकाय सरडा, व्हिडीओ पाहून नेटकरी चकित
Video of Monitor Lizard
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 10:42 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. लाखोंच्या संख्येने व्हिडीओ अपलोड केले जात असल्यामुळे सोशल मीडियावरील वातावरण नेहमीच गरम असते. मात्र, सध्या एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महाकाय सरडा थेट मानवी वस्तीत घुसल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ पाहून अनेकजण अवाक झाले आहेत. (Monitor Lizard enters in human residential area walking on road video goes viral)

मानवी वस्तीमध्ये महाकाय सरडा

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांना भीती वाटत आहे. कारण व्हिडीओतील महाकाय सरडा (Monitor Lizard) थेट मानवी वस्तीमध्ये शिरल्याचे दिसतेय. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामधून हा सरडा आरामात चालतो आहे. हा सरडा रस्त्यावर चालत असताना एका व्यक्तीने आपल्या घरातून त्याचा व्हिडीओ शूट केला आहे. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हिडीओमध्ये दिसणारा प्राणी महाकाय सरडा की मगर ?

सध्या फेसबुक तसेच ट्विटरवर या व्हिडीओची चर्चा होत आहे. काही नेटकऱ्यांनी व्हिडीओतील सरपटणाऱ्या प्राण्याला मगर म्हटले आहे. तर काहींना व्हिडीओतील प्राणी हा मगर नसून दुसरंच काहीतरी असल्याचा दावा केलाय. सध्या मिळालेल्या माहितीनुसार व्हिडीओमध्ये दिसणारा प्राणी हा मगर नसून त्याला Monitor Lizard असे म्हटले जाते.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ नेमका कुठला ? अजून पुष्टी नाही

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची पुष्टी होऊ शकलेली नाही. सध्या यास चक्रीवादळामुळे ओडिशा तसेच पश्चिम बंगाल या दोन राज्यांची मोठी हानी झाली आहे. या राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. याच कारणामुळे हा व्हिडीओ पश्चिम बंगालचा असावा असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. मात्र, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची निश्चित माहिती अजूनतरी मिळालेली नाही.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याला नेटकरी मोठ्या उत्साहाने शेअर करत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ @SRKxCombatant या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 13 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिले आहे. अजूनही अनेकजण या व्हिडीओला आपल्या अकाऊंटवर शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | दोन मधमाश्यांची चक्रावून सोडणारी कामगिरी, शीतपेय पिण्यासाठीची धडपड एकदा पाहाच

Video : रुग्णांना वाचवण्यासाठी जबरदस्त जुगाड, ‘देशी रुग्णवाहिका’ पाहून तुम्हीही सलाम ठोकाल

Video | भरधाव वेगाने घेतला जीव, अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या अंगावर शहारे

(Monitor Lizard enters in human residential area walking on road video goes viral)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.