माणसालाही लाजवेल असा या प्राण्याचा दयाळूपणा; मांजराला दिले जीवदान, व्हिडीओ व्हायरल
माकड मांजराला उचलून विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, पण खूप प्रयत्न करूनही जेव्हा त्याला बाहेर काढता येत नाही, तेव्हा शेवटी एक स्त्री येते आणि मांजरीला बाहेर काढते.
नवी दिल्ली : कधी कुणी संकटात सापडलं की, कोणत्याही माणसाला त्याचा मानवतावाद आठवतो आणि तो मदतीसाठी धावून जातो. मात्र, आजच्या जमान्यात मदतीला धावून जाणारी माणुसकी क्वचितच पाहायला मिळते. आता एखादी व्यक्ती अडचणीत दिसली तर एकतर व्हिडीओ बनवतात किंवा त्याला अडचणीतच सोडून पुढे जातात. मात्र काही व्यक्तींमध्ये मात्र माणुसकी अजूनही शिल्लक आहे. संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करायला अनेक जण तयार असतता.
तर अशी माणुसकी माणसामध्येच नाही तर काही प्राण्यांमध्येही दिसून येते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, तो व्हिडीओ बघून अनेक जणांनी भावूकपणे प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये एक माकड विहिरीत पडलेल्या मांजराचा जीव वाचवताना दिसून येत आहे. त्या व्हिडीओमध्ये जे माकड दिसत आहे ते माकड फिरत फिरत अचानक विहिरीजवळ पोहोचलं, तेव्हा त्या माकडाला एक मांजर विहिरीत पडलेले दिसते. विहिरीत जे माकड पडलं आहे, त्याला बाहेर पडण्याची कोणतीही आशा नाही.
त्या परिस्थितीला बघूनच मांजराने विहिरीत उडी मारली आहे. त्या विहिरीत थोडा चिखलही आहे, मात्र जास्त पाणी नाही. त्यामुळे त्या विहिरीत बुडण्याची कोणतीही शक्यता नव्हती.
Witness the most heartwarming monkey rescue ever! ?❤️ pic.twitter.com/IaRgWUzwUz
— Tansu YEĞEN (@TansuYegen) April 16, 2023
त्याचमुळे माकड मांजराला उचलून विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, पण खूप प्रयत्न करूनही जेव्हा त्याला बाहेर काढता येत नाही, तेव्हा शेवटी एक स्त्री येते आणि मांजरीला बाहेर काढते.
या मांजरासाठी माकडाने दाखवलेली दया, माया, प्रेम यामुळेच हा व्हिडिओही अनेक जणांनी शेअर केला आहे, आणि अनेकजणांना तो भावला आहे.
ट्विटरवरून हा व्हिडीओ @TansuYegen नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एक मिनिट 30 सेकंदाचा असून 6 लाख 45 हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.
त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, या माकडाने त्याला भावूक केले आहे, तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की, ‘खरच माणसांनी या अशा प्राण्यांकडून शिकले पाहिजे’.