VIDEO | विंडो सीटला बसून माकडाने केला प्रवास, व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांनी…

Monkey Video | एका माकडाने सरकारी गाडीतून ३० किमीपर्यंतचा प्रवास केला आहे. हा प्रवास करीत असताना त्याने विडी सीट त्याच्यासाठी निवडली होती. ज्यावेळी माकड प्रवास करीत होते. त्यावेळी प्रवाशांनी त्या माकडाचा प्रवास आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

VIDEO | विंडो सीटला बसून माकडाने केला प्रवास, व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांनी...
Monkey VideoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 11:24 AM

कर्नाटक : सोशल मीडियावर मागच्या काही दिवसांपासून एका माकडाचा व्हिडीओ (Monkey Video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये माकड बसच्या विंडो सीटवरतीबसून मस्ती करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याचा तो व्हिडीओ कर्नाटक (Karnataka) राज्यातील असल्याचं एका हिंदी वेबसाईटनं म्हटलं आहे. त्या व्हिडीओमध्ये दिसत असलेलं माकड केएसआरटीसी (KSRTC) च्या बसमधून प्रवास करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या माकडाने सरकारी बसमधून ३० किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला आहे. ते माकड हावेरी येथील बस थांब्यावर बसमध्ये चढले होते. हमसभावी गावात जाऊन उतरले अशी माहिती मिळाली आहे. माकड प्रवास करीत असताना सोबत प्रवास करणाऱ्या लोकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्या माकडाचं शुटींग केलं आहे. त्यापैकी एकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ १ मिनिट १८ सेंकदाचा

त्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक माकड आरामात बसच्या विंडो सीटवरती बसलं आहे. जिथं माकडं बसलं आहे, तिथं एक बिस्कीटचा पुडा देखील ठेवण्यात आला आहे. माकडं मजेशीर पद्धतीने खिडकीच्या बाजूला असलेल्या सीटवर बसलं आहे. त्याचबरोबर विंडो सीटवरुन बाहेरचा परिसर पाहत आहे. हा व्हिडीओ १ मिनिट १८ सेंकदाचा आहे. सध्याचा व्हायरल व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला तर, तर तुम्हाला इतर प्रवाशांचा आवाज येत आहे.

हे सुद्धा वाचा

माकड आरामात विंडो सीटवरती बसलं आहे

व्हायरल होत असलेला तो व्हिडीओ एक्सवरती @NanuVokkaliga नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मागच्या तीन दिवसांपासून शेअर झाला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती सुध्दा शेअर झाला आहे. व्हिडीओमध्ये आणखी एक गोष्ट पाहायला मिळत आहे, ते माकडं कोणालाही परेशान करताना दिसत नाही. ते माकड आरामात विंडो सीटवरती बसलं आहे आणि बाहेरचा दृष्य पाहत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.