तू जा, मी मुलांची काळजी घेईन; नवऱ्याने बायकोचे बॉयफ्रेंडसोबत लावून दिले लग्न
एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. एका पतीने त्याच्या पत्नीचे अफेअर असल्याचे कळताच अनोखा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने सर्वजण चकीत झाले आहेत.

एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. एका पतीने त्याच्या पत्नीचे प्रियकराशी लग्न लावून देत सर्वांना चकीत केले आहे. तसेच त्याने दोन्ही मुलांचा सांभाळ करणार असल्याचे म्हटले आहे. पतीने पत्नीला सांगितले की, ‘मी दोन्ही मुलांची काळजी घेईन. तुम्ही दोघे फक्त आनंदी राहा.’ दोघांनीही मंदिरात एकमेकांना पुष्पहार घातला. प्रियकराने प्रेयसीच्या कपाळाला सिंदूर लावले. यावेळी महिलेचा पती आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते.
बबलूला कळाले पत्नीच्या अफेअरविषयी
मध्य प्रदेशमधील संत कबीरनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. कटार जोत गावातील बबलूचे गोरखपूरच्या राधिकाशी २०१७ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांना दोन मुले झाली. मोठा मुलगा आर्यन 7 वर्षांचा आणि लहान मुलगी शिवानी 2 वर्षांची आहे. बबलू उदरनिर्वाहासाठी अनेकदा घराबाहेर राहत असे. यादरम्यान त्याची पत्नी राधिका हिचे त्याच गावातील विकास नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. बबलूला ही बाब कळताच त्याने अनोखा निर्णय घेतला आहे. त्याच्या निर्णयाने गवकरी देखील चकीत झाले आहेत.




वाचा: ‘XL साईज काँडम आण… हॉटेलमध्ये…’, प्रसिद्ध उद्योगपतीला पत्नीचे अफेअर कळताच…
बायकोचे लावून दिले लग्न
बबलूला पत्नीच्या अफेअरविषयी कळताच पत्नीसह धनघाटा तहसील गाठले. तेथे त्याने शपथ पत्र तयार केले. या शपथ पत्रात त्याने मुलांचा सांभाळ करणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर दैनाथ शिव मंदिरात विकाससोबत राधिकाचे लग्न लावून दिले. राधिकाला तिच्या नवीन आयुष्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून बबलूने दोन्ही मुलांची जबाबदारी स्वतः घेतली आहे. त्याने दोन्ही मुलांना त्याच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरे लग्न करताना राधिका रडू कोसळले होते. या अनोख्या लग्नाची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. या घटनेबद्दल लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत.