व्ह्युज अन् प्रसिद्धीसाठी कोणत्या थराला? बाळाला घेऊन आई ओढतेय सिगारेट, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडीओमध्ये एका आई आपल्या बाळाला घेऊन सिगारेट ओढत असल्याचे धक्कादायक कृत्य दिसत आहे. रिल्ससाठी या महिलेन सर्व हद्द पार केलेल्या दिसत आहे. या कृत्यामुळे नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओमध्ये बाळाला धुराचा त्रास होत असतानाही आई सिगारेट ओढत राहिलेली दिसत आहे.

व्ह्युज अन् प्रसिद्धीसाठी कोणत्या थराला? बाळाला घेऊन आई ओढतेय सिगारेट, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 1:14 PM

आजकाल सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडीओचा भडीमार पाहायला मिळतो.आणि त्यात या रिल्ससाठी कोण काय करेल हे सांगता यायचं नाही. रिल्सला व्ह्युज, लाइक्ससाठी कोणत्याही थराला जातील काही सांगता यायच नाही. पण याच व्हिडीओसाठी एका आईला आपल्या बाळाचाही काही फरत पडत नसेल तर.

रिल्ससाठी आईची बाळाला घेऊन धक्कादायक कृती  

रिल्ससाठी, व्ह्युजसाठी एका आईने जे कृत्य केलं ते पाहून कोणालाही संताप येईल, हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या महिलेला प्रचंड ट्रोल केलं आहे. आताच्या पिढीतील काही लोक जगाचं भान विसरून आपली मर्यादा ओलांडू लागले आहेत. असाच लाजिरवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या बाळाला घेऊन चक्क सिगारेट ओढल्याचा संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या चिमुकल्याला घेऊन व्हिडीओ बनवताना दिसतेय. पण, व्हिडीओच्या नावावर ही महिला बाळ कडेवर असताना चक्क सिगारेट ओढताना दिसत आहे. सिगारेट ओढत ओढत ती महिला चिमुकल्याला कंबरेवर घेऊन रील करताना दिसतेय. या सिगारेटच्या धुरामुळे बाळाला त्रास होत असून चिमुकला खोकतानाही दिसतोय तरी ती महिला हातातली सिगारेट सोडत नाहीये.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे, “ती एक आई म्हणून अपयशी ठरली”,तर दुसऱ्याने लिहिल आहे “अशा मुलींची लाज वाटते”, तर एकाने म्हटलं “यांच्या कानाखाली दिली पाहिजे, यांची सगळी नशा उतरून जाईल”, अशी संतप्त प्रतिक्रिया या व्हिडीओवर येतच आहेत.

दरम्यान हा व्हिडीओ @_am_pratham या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “ये क्या हो गया है आजकल के जनरेशन को” (हे आजकालच्या पिढीला काय झालंय) असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल 1.7 मिलियन व्ह्युज आले आहेत. पण या व्हिडीओसाठी या महिलेने जे कृत्य केलं आहे ते खरोखरच चुकीचे आणि संतापजनक आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.