Motivational video : आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला प्रामाणिकपणा (Honesty) खूपच कमी पाहायला मिळतो. प्रत्येकजण पैशाच्या मागे लागला आहे. यात तो सर्व काही विसरतो. काहीजणांना मात्र पैशांची गरज तर असते, मात्र त्यांच्याकडे ते पुरेसे नसतात. मेहनत करून त्यांना ते मिळवावे लागतात. त्यात काहीजण शॉर्टकट वापरतात. पण तो मार्ग योग्य नसतो. आपल्यातील प्रामाणिकपणा आपण कायम ठेवायला हवा. अशाप्रकारचा मेसेज देणारे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधीकधी आपण घराबाहेर असताना आपले पैसे, पाकिट कुठेतरी पडते. त्यावेळी आपण आशा सोडून देतो, की ते आपल्याला परत मिळेल. पण ते ज्याला सापडते, ती व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर आपल्याला ते नक्कीच मिळते. असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झालाय. यातून प्रामाणिकपणा, प्रेरणादायी असा मेसेज देण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये दोन मुले दिसत आहेत. ते भाऊ असतात. छोटा भाऊ मोठ्या भावाला म्हणतो, की त्याचे सर्व मित्र फिरायला जात आहेत. माझ्याकडे तर कपडे पण नाहीत. मला कपड्यांसाठी पैसे हवे आहेत. मोठा भाऊ म्हणतो, की आमचे काम सध्या ठीक सुरू नाही, त्यामुळे मालकाशी बोलून सांगतो. तेवढ्यात छोट्या भावाला रस्त्यावरून जात असताना पाकिट सापडते. तो मोठ्या भावाकडे जातो आणि पाकिट देतो. पण मोठा भाऊ त्यातील कागदपत्रे पाहून ते ज्याचे आहे त्याला परत करतो. त्यावेळी तो माणूस खूप खूश होतो. काय मेसेज मिळतो त्यातून, हा व्हिडिओ पाहा…
यूट्यूबवर दानश फाइव्ह स्टार (Danish5star) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 15 मार्चला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. ‘Imandari rakho har kaam hota hai Imandari se‘ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे. तर 3,271,507+ व्ह्यूज व्हिडिओला मिळाले आहेत.