Wedding Card Viral: आमच्याकडे लग्नाला येताना… निमंत्रण पत्रिकेवर वराने पाहुण्यांसाठी लिहीलं असं काही, सगळेच अवाक् !

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील गोहद भागातील एका लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आहे. ती फक्त लग्न पत्रिकाच नव्हे तर त्यामध्ये एक महत्वाचा सामाजिक संदेशही दडलेला आहे

Wedding Card Viral: आमच्याकडे लग्नाला येताना... निमंत्रण पत्रिकेवर वराने पाहुण्यांसाठी लिहीलं असं काही, सगळेच  अवाक् !
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 12:51 PM

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील गोहद भागातील एका लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आहे. ती फक्त लग्न पत्रिकाच नव्हे तर त्यामध्ये एक महत्वाचा सामाजिक संदेशही दडलेला आहे. चंबळ प्रदेशात सुरू असलेल्या दुष्कृत्यांविरुद्ध एक सशक्त पुढाकार आहे. या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलेल्या संदेशाद्वारे समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषत: लग्न समारंभात शस्त्र घेऊन येण्याच्या सवयीशी संबंधित दुष्कृत्यां बद्दल यातून संदेश देण्यात आला आहे.

चंबळ प्रदेशात, विशेषत: भिंड आणि मुरैना जिल्ह्यांमध्ये एक गंभीर वाईट रीत प्रचलित आहे, तेथे लोक शुभ प्रसंगी शस्त्रे घेऊन लग्नासारख्या समारंभात सहभागी होतात. तेथे आत्तापर्यंत गोळीबाराच्या घटनाही सर्रास घडल्या आहेत, ज्या अनेक वेळा जीवघेण्या ठरल्या.  या प्रदेशात 56,000 हून अधिक परवानाकृत तसेच बेकायदेशीर शस्त्रे आहेत आणि अनेक लोक अभिमानाची बाब म्हणून सार्वजनिकपणे ती शस्त्र बाळगत प्रसिद्धी करतात. विशेषतः लग्न किंवा इतर आनंदाच्या प्रसंगी ही शस्त्रे सार्वजनिक प्रदर्शनाचा भाग बनतात.

गेल्या काही वर्षांत गोळीबारामुळे अनेक मृत्यू झाले असून अनेक लोक गंभीर जखमी देखील झाले आहेत. प्रशासनाकडून कडक देखरेख ठेवून आणि इशारे देऊनही या वाईट रितीचा नायनाट करण्यात विशेष यश आलेले नाही.

त्याच पार्श्वभूमीवर या पत्रिकेतून देण्यात आलेला संदेश महत्वाचा ठरत असून सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा आहे.

काय मेसेज आहे त्या पत्रिकेत ?

भिंड जिल्ह्यातील गोहड भागात असलेल्या खनेटा धाम मंदिराच्या महंताच्या भावाचा मुलगा सत्यदीप याने या गंभीर विषयावर पुढाकार घेतला आहे. त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेतून एक संदेश लिहिला आहे, त्यातून समाजातील शस्त्रांच्या वापराविरुद्ध जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रिकेत लिहिलेला संदेश –

” हात जोडून विनंती – आमच्याकडे दोन कुटुंबांमध्ये प्रेमाचं नातं जोडलं जात आहे. लढाई नव्हे, कृपया लग्नाला येथे शस्त्रास्त्र घेऊन येऊ नये .”

सत्यदीपच्या यांच्या या उपक्रमानंतर ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. या मेसेजने अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले असून अनेक लोक त्याचे कौतुकही करत आहेत. हा मेसेज व्हायरल झाला असून सर्वत्र त्याची चर्चा होत आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.