मुलाला दहावीत 35 टक्के मार्क्स मिळाले, आई-वडील आनंदात, म्हणाले,’मुलाने खूप मेहनत केली’
ज्यावेळी दहावीचा निकाल जाहीर झाला, त्यावेळी एका कुटुंबियांनी आपल्या मुलाचा निकाला ऑनलाईन चेक केला. त्यावेळी त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांच्या मुलाला ३५ टक्के मार्क मिळाले आहेत. त्याचबरोबर त्याला प्रत्येक विषयात ३५ मार्क मिळाले आहेत.
मुंबई : ज्या दिवशी मुलांचा निकाल असतो. त्यादिवशी मुलांचे आईवडिल (TRENDING NEWS IN MARATHI) अधिक चिंतेत असतात. त्यांना आशा असते की, त्यांची मुलं चांगले मार्क मिळवतील. सध्या सगळ्या पालकांना असं वाटतं असतं की, आपल्या मुलाला ९० टक्के मार्क मिळाले पाहिजेत. त्यांच्यापेक्षा कमी मार्क (SSC RESULT 2023) मिळाल्यानंतर मुलांवरती पालक अधिक चिडत असल्याचे पाहायला मिळतात. आपल्या देशात काही पालक असे आहेत, मुलगा पास झाला तरी ते मोठ्या उत्साहात (VIRAL NEWS) आनंद साजरा करतात. असा पद्धतीचं एक प्रकरण मुंबईत पाहायला मिळाला आहे.
महाराष्ट्रात दहावीचा निकाल लागल्यापासून पालक आणि विद्यार्थी खूश आहेत. कारण महाराष्ट्रात यावर्षी दहावीचा निकाल चांगला लागला आहे. ज्यावेळी शिक्षण विभागाकडून निकाल जाहीर करण्यात आला. त्यावेळी एका कुटुंबातील मुलाला ३५ टक्के मार्क मिळाले. त्या मुलाला प्रत्येक विषयात ३५ मार्क मिळाले आहेत. विशेष म्हणजे आपल्या मुलाला इतके कमी मार्क मिळाले असून देखील ते अधिक खूष आहेत. त्यांनी मुलगा दहावीला पास झाला म्हणून त्यांचं सेलिब्रेशन सुध्दा मोठं केलं आहे अशी माहिती एका वेबसाईटनं दिली आहे.
विशालचे वडिल रिक्षा चालवतात
ठाण्यात राहणाऱ्या विशाल अशोक कराड हा मराठी माध्यमात शिकत आहे. त्या दहावीच्या परीक्षेत ३५ टक्के मार्क मिळाले आहेत. विशालचे वडिल रिक्षा चालवतात. त्याची आई घरची कामे करते. दोघांनी आपल्या मुलाला शिकवण्यासाठी अधिक मेहनत घेतली आहे.
Video | Vishal Ashok Karad could barely manage 35 marks minimum required for passing SSC exam, but the family celebrated as if he had topped the board. Vishal, a student of Shivai Vidyalay in Uthalsar, Thane has scored unique 35 marks in each subject, His father is a Rickshaw… pic.twitter.com/5lDkW9BRJW
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) June 2, 2023
आई-वडीलांच्या उत्साहाची चर्चा
विशालच्या वडिलांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना सांगितलं की, तो पास झाल्यानंतर आम्ही मोठा उत्साह साजरा केला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आमच्या मुलाने ३५ टक्के मार्क आणले आहेत, ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण त्याने दहावीची परीक्षा पास केली आहे. एक ट्विट चांगलचं व्हायरल झालं आहे. त्या ट्विटला अनेक मजेशीर कमेंट आल्या आहेत.