जेव्हा अजित पवारांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा फोन जातो… ; सोशल मीडियावर रील्सचा नुसता धुमाकूळ

Instagram Reels on Ajit Pawar Decision : महाराष्ट्रातील राजकारण म्हणजे गजकर्ण!; नव्या युतीवरील रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल

जेव्हा अजित पवारांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा फोन जातो... ; सोशल मीडियावर रील्सचा नुसता धुमाकूळ
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 8:39 AM

मुंबई : सध्या सोशल मीडियाचा विशेषत: मीम्स् आणि रील्सचा जमाना आहे. जगाच्या पाठीवर कुठेही काहीही घडलं तरी त्याचे सोशल मीडियावर पडसाद पाहायला मिळतात. त्यातच आता राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेत. विरोधी पक्षनेते असणारे अजित पवारच आता सत्तेत जाऊन बसलेत. आता एवढी मोठी घटना घडल्यावर त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया उमटणं सहाजिक आहे.

अजित पवारांच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय. रील्स स्टारच्या प्रतिभेला बहर आलाय. कुणी गाण्याचं बॅगराऊंड लावत फोटोचं रील बनवलंय. तर कुणी शरद पवारांचा फोन आल्यास अजित पवारांची प्रतिक्रिया काय असेल याचा अंदाज बांधत मजेशीर रील बनवलं आहे. तर कुणी आता आपल्या मतांना काहीही किंमत नाहीये. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करणं बंद करा, असं म्हटलंय.

ओंकार शिंदे या व्हीडिओ क्रिएटर एक हलकं फुलकं रील बनवलं आहे. यात अजित पवार यांना शरद पवारांचा फोन येतो. तेव्हा काका, काका, काका म्हणत अजित पवार प्रतिसाद देण्यास नकार देतात. त्याच्या पुढे जाऊन ज्या नंबरशी आपण संपर्क करू इच्छिता तो सध्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यात बीझी आहेत. नंतर फोन करा, असं अजित पवार म्हणताना दाखवण्यात आलं आहे.

सुप्रिया सुळे यांचा फोन आल्याचंही या रीलमध्ये दाखवण्यात आलं आहे. तेव्हा मी नाही येत आता, असं अजित पवार म्हणताना दाखण्यात आलं आहे. आणखीही काही नेत्यांचे फोन आल्याचं ओंकार शिंदेने या रीलमध्ये दाखवलं आहे.

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरनेही रील शेअर केलंय. यात तिने महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे गजकर्ण झालं आहे, असं म्हटलं आहे. या गजकर्णातून आपण बरंच काही शिकण्यासारखं आहे. गेल्या पाच वर्षात सगळ्यांनी वाटून महाराष्ट्राला खाल्लेलं आहे. त्यामुळं तुमच्या मतांना इथं काहीही किंमत नाहीये. त्यामुळे इन्स्टाग्राम पोस्टवर ज्या कमेंट तुम्ही करता ते बंद करा कारण तुमच्या मतांना जिथं किंमत नाही तिथं तुमच्या कमेंटला कोण सिरीयसली घेणार?, असं अंकिता म्हणत आहे.

तर जाने कहाँ मेरा जिगर गया जी या गाण्यावर परफेक्ट फोटो जमवत हे रील करण्यात आलं आहे. अनिकेत म्हस्के या अकाऊंटवरून हे रील शेअर करण्यात आलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.