‘काटा लगा’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये प्रवाशांचा डान्स, व्हिडीओ व्हायरल
viral news : सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मिलियनमध्ये लाईक मिळाले आहेत. तर संमिश्र पद्धतीचे कमेंट सुध्दा त्या व्हिडीओच्या खाली आल्या आहेत.
मुंबई : मुंबई लोकल (Mumbai Local) हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या देशात मुंबई लोकलला एक वेगळं स्थान आहे. त्यामध्ये होणाऱ्या गोष्टींची सुध्दा तेव्हढीचं चर्चा होत आहे. दररोज लाखो प्रवासी ट्रेनमधून प्रवास करतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Video Goes Viral) रोज पाहायला मिळतात. काही व्हिडीओ चांगले असतात, ते लोकांच्या पसंतीला अधिक पडतात. आतापर्यंत ट्रेनमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती (trending video) व्हायरल झाले आहेत.
काही प्रवासी मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहत असतात. काहीजण मोबाईल गेममध्ये गुंग असतात. तर काही प्रवास भजन करीत प्रवास करतात. काही प्रवाशांना खिडकीच्या बाजूला गाणी ऐकत प्रवास करायचो असं सगळं चित्र मुंबईच्या लोकलमध्ये पाहायला मिळतात.
सध्या मुंबईतील लोकलमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये काही प्रवासी बॉलिवूडमधील एक हीट गाणं गात आहेत. तर काही प्रवासी त्या गाण्यावर डान्स करीत आहेत. ते गाणं लता मंगेशकर यांनी गायलं होतं. हा व्हि़डीओ सोशल मीडियावर आल्यापासून प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला आतापर्यंत असंख्य कमेंट आल्या आहेत. काही कमेंट मजेशीर आणि तर काही कमेंटमधून नेटकऱ्यांनी त्या लोकांना सल्ला दिला आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर ज्यांना हा व्हिडीओ आवडला आहे. त्यांनी त्यांच्या खात्यावर तो शेअर सुद्धा केला आहे.
ढोलकी सारखं वाचवणाऱ्या माणसाचं काही लोकांनी कमेंटमध्ये कौतुक केलं आहे.
“दुर्दैवाने, लोकल ट्रेनचा आनंद घेणारी ही शेवटची पिढी आहे,” असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
जी लोकं गाणं गात आणि त्या गाण्यावर काहीजण नाचत आहेत, तिचं माणसं आयुष्याची खरी मजा घेत आहेत असं देखील एकाने म्हटलं आहे.