VIDEO | मुंबई लोकलमध्ये ‘ड्रग्ज’ची नशा करीत असलेल्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल

Trending Video | सध्या मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सहा तरुण 'ड्रग्ज'ची नशा करीत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

VIDEO | मुंबई लोकलमध्ये 'ड्रग्ज'ची नशा करीत असलेल्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल
mumbai local newsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 8:35 AM

मुंबई : दोन दिवसापूर्वी मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) बसण्यावरुन दोन प्रवाशांचा वाद झाल्याचा एक व्हिडीओ (video viral) चांगलाचं व्हायरल झाला होता. सध्या एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे पोलिस आणि इतर रेल्वेची यंत्रणा सुध्दा खडबडून जागी झाली आहे. सहा तरुण लोकलमधून प्रवास करीत असताना ‘ड्रग्ज’ची नशा करीत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ (twitter trending video) पाहिल्यापासून लोकांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी असा नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी लोकलमध्ये घडली असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, काही तरुण नालासोपारा स्टेशनच्या दरम्यान लोकलमध्ये खुलेआम पद्धतीने ड्रग्ज घेत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुण गर्दीत नशा करीत आहेत. एक तरुण मोबाईलवरुन ड्रग्जची मागणी करीत आहे. @ADARSH7355 नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याने असं म्हटलं आहे की, सहा तरुण लोकांच्या गर्दीत ड्रग्जची नशा करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

पोलिसांचं पथक तरुणांच्या मार्गावर

हा व्हिडीओ जेव्हापासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तेव्हापासून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणातील आरोपींना शोधण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे पोलिसांना या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांचं पथक त्या जणांच्या मार्गावर असून कधीही त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

लोकांकडून मदतीचं आवाहन

रेल्वे प्रशासनाकडून सगळ्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापैकी एक जरी तरुण कुठेही फिरताना दिसला तरी त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात येणार आहे. सहा जणांवरती कडक कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे की, त्यापैकी तुम्ही कोणाला ओळखत असाल, तर आम्हाला नक्की मदत करा असं देखील आवाहन केलं आहे.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.