आयडियाची कल्पना! स्कॅमरने पोलीस बनून फोन केला अन् पुढे जे घडलं… पाहा व्हिडीओ
२०२४ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यातच गेल्या वर्षीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता मुंबईत एका व्यक्ती सायबर गुन्ह्याचा शिकार होता होता वाचला आहे.
Mumbai Cyber Fraud: गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राईमच्या घटनेत वाढ होत आहे. त्यातच आता काही सायबर चोर बँकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करत आहेत. यामुळे पोलिसांकडून वारंवार सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. पण जर तुम्ही सतर्क राहिला नाहीत, तर मोठी फसवणूक होऊ शकते. २०२४ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यातच गेल्या वर्षीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता मुंबईत एका व्यक्ती सायबर गुन्ह्याचा शिकार होता होता वाचला आहे.
नेमकं काय घडलं?
एका स्कॅमरने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत व्हिडीओ कॉल केला. यावेळी तो सायबर चोर त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्या व्यक्तीच्या हुशारीमुळे तो बचावला आणि स्कॅम करणाऱ्याचा गुन्हा उघडकीस आला. याचा एक व्हिडीओही त्या व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ त्याने स्वत: पोस्ट करत सर्वांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
या व्हिडीओत पोलिसाच्या वेशात असलेल्या एक स्कॅमर त्या व्यक्तीला फोन करतो. तेव्हा ती व्यक्ती फोन उचलते. यानंतर त्या व्यक्तीने युक्ती करत स्वत: कॅमेऱ्यासमोर न येता त्याच्या घरातील पाळीव श्वानाला कॅमेऱ्यासमोर दाखवले. याद्वारेच त्याने स्कॅमरशी बोलणे सुरु केले. यावर तो स्कॅमर अनेकदा सर तुम्ही कॅमेऱ्यासमोर या, तुम्ही कॅमेऱ्यासमोर या, असे सांगत आहे. मात्र ती व्यक्ती आलोय कॅमेऱ्यासमोर असं सांगत वारंवार आपल्या श्वानाला दाखवत आहेत, असा संपूर्ण व्हिडीओ पाहायला मिळत आहे. मुंबई पोलीस बनायचे होते, पण स्कॅम कॉल फ्लॉप झाला, असे मजेशीर कॅप्शन त्याने व्हिडीओला दिले आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओच्या शेवटी स्कॅमरही स्वत:चे हसू रोखू शकला नाही. त्याने काही काळानंतर फोन ठेवून दिला. हा मजेशीर व्हिडीओ @shinny_martina या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला. यावर अनेकांनी विविध कमेंटही पाहायला मिळत आहे. “स्कॅम करण्याचा प्रयत्न करणारा स्वत:च हसता हसता पळून गेला”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “काय स्कॅमर बनणार रे तू”, असेही एकाने म्हटले आहे. यापेक्षा “मजेशीर प्रँक मी आजपर्यंत पाहिलेला नाही”, असे एकाने म्हटले आहे.