Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्र अजून झोपलाच नाही!; 1 कोटी लोकांनी पाहिलेला चिमुकलीचा व्हीडिओ, एकदा बघाच

Chandra Zoplach Nahi Viral Video : सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल होतात. या व्हीडिओंना लाखो लोक पाहतात. असाच एक भन्नाट व्हीडिओ तुम्ही पाहिलाच असेल. हा व्हीडिओ आहे. एका चिमुकलीचा... एका लहान मुलीला झोपवण्याचा तिचे वडील प्रयत्न करत असतात. पण ती झोपत नाही... या दोघांमधील संवाद सध्या प्रचंड चर्चेत आहे.

चंद्र अजून झोपलाच नाही!; 1 कोटी लोकांनी पाहिलेला चिमुकलीचा व्हीडिओ, एकदा बघाच
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 3:03 PM

मुंबई | 24 जानेवारी 2024 : लहान मुलं निरागस असतात. त्यांची कल्पनाशक्ती भन्नाट असते. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोणही अगदीच निरागस आणि तितकाच खरा असतो. असाच व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका चिमुकलीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात या चिमुकलीचा आणि तिच्या वडिलांसोबतचा संवाद आहे. या संवादाने नेटकऱ्यांना भूरळ घातली आहे. हा व्हीडिओ 10 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. नेटकऱ्यांना या व्हीडिओला भरभरून पसंती दिली आहे.

वडील मुलीचा भन्नाट व्हीडिओ व्हायरल

ओवी नायक या चिमुकलीचा हा व्हीडिओ आहे. यात ओवी झोपावी यासाठी तिचे वडील अंगाई गात आहेत. तू डोळे झाक मी गाणं म्हणतो, असं तिचे वडील म्हणतात. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही, हे अंगाईगीत गात आहेत. यावर ती चिमुकली म्हणते, नाही झोपला… मग वडील म्हणतात, नको झोपू दे…पण मला गाणं म्हणू दे, असं तिचे वडील म्हणतात. आणखी थोडी अंगाई गातात. मग पुन्हा ती म्हणते चंद्र नाही झोपला. मग तिचे वडील तिला हलकेच रागावतात आणि म्हणतात. नाही झोपला चंद्र? नको झोपू दे पण तू झोप…, वडील मुलीतील हा संवाद सोशल मीडियावर प्रचड व्हायरल आहे.

ओवीचा व्हीडिओ व्हायरल

चंद्र झोपला नाही मग मीच का झोपू…? अंगाई म्हणू म्हणू कंटाळा आलाय, असं म्हणत हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला आतापर्यंत 10 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तसंच 5 लाख 20 हजार लोकांनी हा व्हीडिओ लाईक केलाय.सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.