Photos : अंतराळात सापडली रहस्यमय वस्तू; वैज्ञानिक म्हणतायत हे भयावह, आधी कधीही पाहिलं नाही!
अवकाशा(Space)तील प्रत्येक हालचालींवर नजर ठेवणारे शास्त्रज्ञ (Scientist) आता एका गोष्टीनं आश्चर्यचकित झालं आहेत. या मागचं कारणही मोठं आहे. शास्त्रज्ञांना पृथ्वीपासून 4000 प्रकाशवर्षां(Light year)च्या अंतरावरून दर 20 मिनिटांनी रेडिओ सिग्नल मिळत आहेत.

Mysterious Object In Space : अवकाशा(Space)तील प्रत्येक हालचालींवर नजर ठेवणारे शास्त्रज्ञ (Scientist) आता एका गोष्टीनं आश्चर्यचकित झालं आहेत. या मागचं कारणही मोठं आहे. शास्त्रज्ञांना पृथ्वीपासून 4000 प्रकाशवर्षां(Light year)च्या अंतरावरून दर 20 मिनिटांनी रेडिओ सिग्नल मिळत आहेत. अंतराळात यापूर्वी कधीही न पाहिलेला किंवा अनुभवला नसलेला हा रेडिओ सिग्नल पाहून शास्त्रज्ञांची तारांबळ उडालीय. ते विचार करताहेत की शेवटी हे काय आहे? कारण अंदाज लावणं फार कठीण आहे. यावर शास्त्रज्ञांचं संशोधन सुरू आहे. ही वस्तू अंतराळात 4000 प्रकाशवर्ष दूर आहे, हे सर्व रहस्यमय आहे. डेली मेलच्या मते, शास्त्रज्ञानं सुचवलं, की ऑब्जेक्ट न्यूट्रॉन तारा किंवा मजबूत चुंबकीय क्षेत्र असलेल्या पांढऱ्या ताऱ्याचे अवशेष किंवा पूर्णपणे भिन्न प्रकारची ही वस्तू असू शकते.

अवकाशात सापडलेली गूढ वस्तू
मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जन
मार्च 2018मध्ये ही वस्तू पहिल्यांदा अंतराळात दिसली होती. ही वस्तू ताशी तीन वेळा रेडिओ सिग्नल किंवा ऊर्जा सोडते, असं म्हणतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा ही वस्तू रेडिओ सिग्नल सोडते तेव्हा ती पृथ्वीवरून दिसणारी सर्वात तेजस्वी रेडिओ लहरी बनते. हे आकाशीय दीपगृहासारखं दिसतं. ही वस्तू तरंगांसह मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करत असल्याचं शास्त्रज्ञांचं निरीक्षण आहे. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ नताशा हर्ले वॉकर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी या वस्तूचा शोध लावला.

अवकाशात सापडलेली वस्तू (सौ. नताशा हर्ले वॉकर/AFP)
रेडिओ लहरींचं मॅपिंग करत असताना सापडली वस्तू
नताशा यांची टीम अंतराळातील रेडिओ लहरींचं मॅपिंग करत असताना ही वस्तू सापडली. शास्त्रज्ञांनी सांगितलं, की तपासणीच्या दरम्यान वस्तू कधी दिसते तर कधी गायब होते. हे अनपेक्षित आहे. शास्त्रज्ञांनी सांगितलं, की ही एक भयावह घटना आहे आणि ती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. डॉ. नताशा म्हणतात, की आमचा शोध पृथ्वीपासून 4000 प्रकाशवर्षे दूर आहे. आपल्या आकाशगंगेच्या अगदी मागे आहे, असंही त्या म्हणाले.
#breaking A team mapping radio waves has discovered something unusual that releases a giant burst of energy three times an hour, & it’s unlike anything astronomers have seen before. https://t.co/PSfpzi6oMM @CurtinMedia @CurtinUni @ColourfulCosmos @Nature @PawseyCentre @CSIRO_ATNF pic.twitter.com/uipt9rGgfC
— ICRAR (@ICRAR) January 26, 2022