Mysterious Holes: अटलांटिक समुद्राच्या तळाशी आढळली गूढ छिद्रे; अजब रहस्य पाहून वैज्ञानिकही शॉक झाले
अमेरिकन वैज्ञानिकांना संशोधनादरम्यान अटलांटिक समुद्रात पृष्ठभागापासून 2.7 किलोमीटर खोलीवर समुद्रतळाशी अज्ञात आणि रहस्यमय अशी छिद्रे दिसली आहेत. एका सरळ रेषेत विशिष्ट अंतर ठेवून कुणीतरी ही छिद्रे बनवली असावीत असं या छिंद्रांकडे पाहिल्यावर भासत आहे. वैज्ञानिकांनी फेसबुकवर याबाबतची माहिती शेअर करून ही छिद्रे कशाची आहेत याची माहिती जगाकडे मागितली आहे.
वॉशिंग्टन : महासागर अर्थात समुद्र हा अनेक रहस्यांनी भरलेला आहे. यातील अनेक रहस्य उलगडण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत. समुद्रतील अनेक गूढ उकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांना अटलांटिक महासागरातील(Atlantic Ocean) रहस्यमय छिद्रे(Mysterious Holes) दिसली. अटलांटिक समुद्राच्या तळाशी जवळपास तीन किमी अंतरावर ही गूढ छिद्रे आढळली आहेत. ही अजब आणि रहस्यमयी छिद्रे पाहून वैज्ञानिकही शॉक झाले आहेत. अमेरिकन शास्त्रज्ञांनी जगातील तज्ञ आणि शास्त्रज्ञांना ही छिद्रे ओळखण्यासाठी मदत मागितली आहे. खोल समुद्रात संशोधन करत असताना हे रहस्यमयी छिद्र सापडलेय.
एका सरळ रेषेत विशिष्ट अंतरावर दिसली छिद्रे
अमेरिकन वैज्ञानिकांना संशोधनादरम्यान अटलांटिक समुद्रात पृष्ठभागापासून 2.7 किलोमीटर खोलीवर समुद्रतळाशी अज्ञात आणि रहस्यमय अशी छिद्रे दिसली आहेत. एका सरळ रेषेत विशिष्ट अंतर ठेवून कुणीतरी ही छिद्रे बनवली असावीत असं या छिंद्रांकडे पाहिल्यावर भासत आहे. वैज्ञानिकांनी फेसबुकवर याबाबतची माहिती शेअर करून ही छिद्रे कशाची आहेत याची माहिती जगाकडे मागितली आहे.
अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फिरिक अॅडमिनिस्ट्रेशनने (नोआ) आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून या छिद्रांची छायाचित्रे शेअर केली आहेत. ही छिद्रे कशाची आहेत याबाबत काही माहिती वाचण्यात अथवा ऐकण्यात आली असल्यास आम्हाला सांगावे असे ‘नोआ’ने फेसबुक पोस्टवर म्हंटले आहे.
यापूर्वीही दिसली अशी छिद्रे
अशी छिद्रे यापूर्वीही या परिसरात आढळली होती. मात्र, त्यांचा स्रोत अद्यापही जगासाठी रहस्य बनून राहिला आहे. एखादा माणूस जसे छिद्र बनवेल तशीच ही छिद्रे आहेत. एखाद्या हत्याराने तिथे खोदकाम केले असावे असे छिद्रांकडे पाहून वाटते. ‘नोवा’च्या पाणबुड्यांनी तीनवेळा या छिद्रांचे निरीक्षण केले आणि त्यांचा नकाशा बनवला.
ही छिद्र एलियन्सनी बनवली असावीत
रिमोट कंट्रोलवर चालणार्या एका वाहनाचाही वापर करुन या छिद्रांचे अनेक छायाचित्रे घेण्यात आली. फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोंवर अनेक युजर्सच्या प्रतिक्रिया येत आहेत. एखाद्या कंपनीने या छिद्रांचे खोदकाम केले असावे. जमिनीतून गोड्या पाण्याचे उमाळे आले असावेत. एखाद्या विशिष्ट खेकड्याचे हे काम असेल अशा अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. तर ही छिद्र एलियन्सनी बनवली असावीत अशी कमेंट एका युजरने केली आहे.