आजीचा नागीण डान्स सगळ्या पोरींमध्ये वरचढ! व्हिडीओ व्हायरल

| Updated on: May 23, 2023 | 4:58 PM

Nagin Dance: सोशल मीडियावर अशा गोष्टी पाहायला मिळतात, ज्याची कधी कधी लोकांना अपेक्षाही नसते. सर्वोत्कृष्ट गोष्टी आणि सर्वात वाईट गोष्टी. कधी कुणी गाताना दिसतंय, तर कधी नाचताना दिसतंय. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

आजीचा नागीण डान्स सगळ्या पोरींमध्ये वरचढ! व्हिडीओ व्हायरल
Dadi dancing nagin dance
Follow us on

मुंबई: एकेकाळी देशात आणि जगात काय घडतंय हे टीव्ही पाहिल्यानंतरच कळत होतं, पण आता प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट पटकन कळते आणि सोशल मीडियाने चमत्कार केला आहे. सोशल मीडियावर अशा गोष्टी पाहायला मिळतात, ज्याची कधी कधी लोकांना अपेक्षाही नसते. सर्वोत्कृष्ट गोष्टी आणि सर्वात वाईट गोष्टी. कधी कुणी गाताना दिसतंय, तर कधी नाचताना दिसतंय. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओमध्ये एक आजी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आजीची ऊर्जा पाहण्यासारखी आहे.

आजी ज्या वयात नाचत असते, त्या वयात स्त्रियांना उठणे, बसणे, चालणे सुद्धा अवघड असते, पण या आजीला पाहून असे वाटते की म्हातारपण अजूनही त्यांच्यापासून दूर आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ढोल वाजत आहेत आणि काही मुली डान्स करत आहेत. दरम्यान आजीही चांगल्याच नाचत आहेत, बघणारेही बघतच राहतात. मधेच नागिनची म्युजिक वाजते तेव्हा आजीची स्टाईल पाहण्याजोगी असते. यात ती जबरदस्त नागिन डान्स करताना दिसत आहे. तसेच त्यांनी आपल्या नृत्याने सर्वांना प्रभावित केले आहे. आजीमध्ये अद्भुत ऊर्जा आहे आणि नृत्य कौशल्य देखील आश्चर्यकारक आहे.

आजीचा हा जबरदस्त डान्स व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 4.3 मिलियन वेळा पाहिले गेले आहे, तर 43 लाख 3 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक देखील केला आहे.

त्याचबरोबर आजीला उड्या मारताना पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी म्हणतंय की आजीने धुमाकूळ घातला, तर कुणी म्हणतंय की आजी नाचणाऱ्या सगळ्या मुलींना वरचढ ठरली.