‘चाचा ओss चाचा…’ हे आजोबा भलतेच जोशात आलेत, बहुतेक 50 वर्षानंतर भेटले असावेत! Funny video viral

Nagin Dance : इंटरनेटच्या (Social media) जगात वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जिथे दोन ज्येष्ठांनी अक्षरश: धमाका केला.

'चाचा ओss चाचा...' हे आजोबा भलतेच जोशात आलेत, बहुतेक 50 वर्षानंतर भेटले असावेत! Funny video viral
दोन ज्येष्ठ नागीण डान्स करतानाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 10:12 AM

Nagin Dance : इंटरनेटच्या (Social media) जगात वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत असतात. पाश्चात्य नृत्य असो किंवा शास्त्रीय नृत्य… विविध प्रकारचे हे व्हिडिओ दररोज तुमचे मनोरंजन करतात. पण अनेकदा असे डान्सचे व्हिडिओ समोर येतात ज्यांना पाहून आपले हसून हसून पोट दुखेल. जसे की नागीण डान्सचे व्हिडिओ… असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जिथे दोन ज्येष्ठांनी अक्षरश: धमाका केला. ‘जिंदगी जियो तो जिंदादिली के साथ’ अशी एक जुनी म्हण आहे. म्हणजे प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद घ्या. तुमचे वय काय आहे हे महत्त्वाचे नाही? तुम्ही किती तरूण आहात किंवा वृद्ध आहात हे महत्त्वाचे नाही. या विधानाचे चित्रण करणारा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिथे दोन वडिलधाऱ्यांनी मिळून असा नागीण डान्स केला, जे पाहून भल्याभल्या तरुणांनाही स्फूरण चढेल.

इन्स्टाग्रामवर शेअर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की लग्नात डान्स पार्टी सजली आहे. जिथे एक आजोबा नागीण डान्स करायला लागतात. ते अक्षरश: उड्या मारून डान्स करतात. त्यांचा एक मित्र बीन वाजवण्याचा अभिनय करतो आणि दुसरा मित्र त्या बीनचा आवाज ऐकून जमिनीवर उडी मारतो, असे चित्र दिसत आहे. एक वयस्कर व्यक्ती बीन वाजवण्याचा अभिनय करत असताना, दुसरा मित्र नाचू लागतो. हे पाहताना आपल्याला मात्र मजा येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर Giedde नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

‘व्वा काय डान्स आहे’

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तो प्रचंड शेअर करत आहेत आणि मजेशीर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. एवढेच नाही तर यूझर्स या फनी व्हिडिओवर भरभरून कमेंट करत आहेत. एका यूझरने लिहिले, की आजोबांच्या डान्सने माझे मन जिंकले. तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की व्वा काय डान्स आहे. आणखी एका यूझरने लिहिले, ‘चाचा ओ चाचा हो गया… थोड़ा रेस्ट कर लीजिए’. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा :

दोघात तिसरा, आता पैसे विसरा…; पेट्रोल पंपावर असा काय लोचा होतो? पाहा Funny Video

Video : खाद्यपदार्थांवरचे प्रयोग काही थांबेना! आता Omeletteची ‘ही’ नवी Recipe होतेय Viral

लग्नात नवरीच्या पराक्रमाने लोकं म्हणताहेत, असली नवरी रशिया-युक्रेनच्या युद्धात पाहिजे..!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.