Nanded Viral Video: पूराच्या पाण्यात थर्माकॉलवर बसून गेला, पण नवदेव लग्नाला गेला! ‘त्या’ 7 किलोमीटरचा प्रवास

Nanded Viral Video: पण हा व्हिडीओ जरा हटके आहे. ह्यातली माणसं एकदम ओक्के मधी थर्माकॉलवर बसलीत आणि लग्नसाठी निघालीत. विशेष म्हणजे ह्यात नवरदेव सुद्धा आहे! कसंय पूर काय येत राहतो. मुलगी भेटत नाही, लग्नं होत नाहीत त्यामुळे पाणी वगैरे काय या नवरदेवाला अडवू शकत नाही.

Nanded Viral Video: पूराच्या पाण्यात थर्माकॉलवर बसून गेला, पण नवदेव लग्नाला गेला! 'त्या' 7 किलोमीटरचा  प्रवास
Nanded Viral Video MarriageImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 9:32 AM

नांदेड: लोकं आणि लोकांच्या लग्नातली मजा! उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी तर ही गोष्ट…गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात चांगलाच पाऊस (Mahrashtra Monsoon) पडतोय. या धो धो पावसाने सगळ्यांचेच हाल झालेत. नांदेड (Nanded) मध्ये प्रचंड पाऊस झालाय. या पावसाने पूरस्थिती तयार झालीये. लोकं अक्षरशः पाण्यातून एकमेकांना आधार देत-घेत चाललेत. मुसळधार पावसाचं एक वैशिष्ट्य असतं. तो आला की एकटा येत नाही, सोबत करामती आणि मिम्स घेऊन येतो. या गेल्या काही दिवसात प्रचंड करामती झाल्यात, बरेच व्हिडीओ व्हायरल झालेत. कधी टेम्पोच काय चालता चालता वाहून गेला, कधी काय तर कधी काय. पण हा व्हिडीओ जरा हटके आहे. ह्यातली माणसं एकदम ओक्के मधी थर्माकॉलवर (Thermocol) बसलीत आणि लग्नसाठी निघालीत. विशेष म्हणजे ह्यात नवरदेव सुद्धा आहे! कसंय पूर काय येत राहतो. मुलगी भेटत नाही, लग्नं होत नाहीत त्यामुळे पाणी वगैरे काय या नवरदेवाला अडवू शकत नाही.

व्हिडीओ

नेमकं काय घडलं?

या व्हिडीओमध्ये थर्माकॉलवर बसून वरात चालली आहे. नवरदेव आणि बाकी लोकं थर्माकॉलवर बसलेत आणि निघालेत लग्नाला! उतावीळ नवरा आणि गुडग्याला बाशिंग ही म्हण आपण नेहमी ऐकतो, पण असा खरा खुरा प्रकार नांदेड मध्ये घडलाय. लग्नासाठी एका नवरदेवाने पुरातून चक्क सात किलोमीटर प्रवास केला. नदीतून जाणारी ही अनोखी वरात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे . नांदेड जिल्ह्यात संततधार पावसामुळे पूर आला . नांदेड मधील हदगाव तालुक्यात पैनगंगा, कयाधु नदीला पूर आला. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आहे . त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले. हदगावमधील करोडी येथील युवक शहाजी राकडे याचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील उमेरखेड तालुक्यातील चिंचोळी येथील गायत्री गोंडाडे या युवतीशी जमला. काल 14 जुलै रोजी हळद आणि टिळयाचा कार्यक्रम आणि 15 जुलै रोजी लग्न ठरलं. पण मागील अनेक दिवसांपासून नांदेड मध्ये पाऊस सुरू झाला. अनेक मार्ग बंद झाले, हदगाव – उमरखेड हा मार्ग बंद झाला .पण कोणत्याही परिस्थितीत लग्न करायच अस ठरवलेल्या नवरदेवाने पुराच्या पाण्यातून वरात काढली. करोडी ते चिंचोली असा सात किलोमीटरचा प्रवास थर्माकोलचच्या होड्यांवर करून हा पठ्ठा लग्न स्थळी पोहचला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.