हा तर खऱ्या आयुष्यातला बंटी;चक्क खोट्या सहीवर राष्ट्रपती भवन अन् ताजमहाल विकला, 8 राज्यांचे पोलीस होते मागावर
असा एक मोठा चोर ज्याने त्याच्या एका खोट्या सहीवर चक्क राष्ट्रपती भवन अन् ताजमहाल विकला होता. त्याने पोलिसांनाही हैराण करून सोडलं होतं.त्याला पकडण्यासाठी चक्क 8 राज्यांचे पोलीस त्याच्या मागावर होते मात्र तरीही हा ठग काही केल्या हाती येत नव्हता. तुम्हाला माहितीये का हा कोण आहे?
![हा तर खऱ्या आयुष्यातला बंटी;चक्क खोट्या सहीवर राष्ट्रपती भवन अन् ताजमहाल विकला, 8 राज्यांचे पोलीस होते मागावर हा तर खऱ्या आयुष्यातला बंटी;चक्क खोट्या सहीवर राष्ट्रपती भवन अन् ताजमहाल विकला, 8 राज्यांचे पोलीस होते मागावर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/7-20.jpg?w=1280)
तुम्ही बंटी और बबली हा चित्रपट पाहिला असेल. त्यात ही दोघे मिळून सर्वांना कशापद्धतीने फसवत असतात हेही तुम्ही पाहिलं असेल. त्यात एक सीन असा आहे की, बंटी असतो तो एका परदेशी व्यक्तिला चक्क ताजमहाल विकतो.
त्यासाठी हे काय काय करातात हे तर सर्वांनी पाहिलं आहे. पण तुम्हाला माहितीये का की हा किस्सा खरोखरंच घडला होता. म्हणजे चित्रपटाल्या बंटी-बबलीने नाही तर जगातील सर्वात मोठा ठग मानला जाणाऱ्या एका व्यक्तीने.
शक्कल लढवून ऐतिहासिक वास्तूंचे व्यवहार केले
होय, या व्यक्तीने अशा काही शक्कल लढवून ऐतिहासिक वास्तूंचे व्यवहार केले होते. हा इतका डोक्याने हुशार होता की, त्याच्या या फसवेगिरीवर कोणालाही संशय येत नसे. हा व्यक्ती म्हणजे जगातील सर्वात मोठा ठग म्हटलं जातं. या ठग व्यक्तीला नटवरलाल म्हटलं जायचं. पण त्याचं खरं नाव होतं मिथिलेशकुमार श्रीवास्तव. त्याने 50 हून अधिक बनावट नावे घेत 100 हून अधिक गुन्हे केले आहे. एवढच नाही तर त्याने ताजमहाल, लाल किल्ला, संसद भवन विकल्याच्या कहाण्या प्रसिद्ध आहेत.
50 हून खोटी नावे ठेवली होती
नटवरलाल फसवणूक आणि लबाडीसाठी हुशार होता. त्याने 50 हून खोटी नावे ठेवली होती. या बनावट नावांच्या माध्यमातून, ते अनेक लोकांना फसवत होता. मिस्टर नटवरलालने फसवणुकीची सुरुवात फक्त 1 हजार रुपयांपासून केली होती आणि त्यानंतर तो थांबलाच नाही. त्याने केवळ 1 हजार रुपयांपासून फसवणुकीची सुरुवात केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नटवरलाल बनावट स्वाक्षऱ्या बनवण्यात माहिर होते. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या शेजाऱ्याच्या सहीची नक्कल करून बँकेतून अनेकद पैसेही काढल्याचं बोललं जातं. तो कोणाचीही सही सहज आणि हुबेहूब करू शकत होता ही त्याची खासियत होती. यातूनच त्याला एवढा विश्वास आला की त्याने थेट ताजमहाल आणि लाल किल्ला विकण्याची हिंमत केली आणि तीही अनेकदा.कसं ते पाहा.
लाल किल्ला दोनदा आणि राष्ट्रपती भवन एकदा विकले होते
एका रिपोर्टनुसार, असं म्हटलं जातं की नटवरलालने ताजमहाल 3 वेळा, लाल किल्ला दोनदा, राष्ट्रपती भवन एकदा आणि संसद भवनही विकलं आहे. तो हातचलाखी करून ऐतिहासिक इमारतींची बनावट कागदपत्रे तयार करत असत आणि उच्च सरकारी अधिकारी असल्याचे सांगून परदेशी व्यावसायिकांना विकत असत.
त्याचे फसवणुकीचे किस्से ऐकून तुम्हालाही बंटी और बबलीची कहाणी आठवली असेल ना. पण तो चित्रपट होता आणि हे सत्य . त्यांच्या फसवणुकीच्या कथा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हत्या.
राष्ट्रपतींसमोरच त्यांची सही जशी त्या तशी कॉपी केली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जातं की एकदा नटवरलालला राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्याने राष्ट्रपतींच्या सहीची अगदी तशीच नक्कल केली, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.
नटवरलालने राष्ट्रपतींना गंमत म्हणून असं म्हटलही होतं की, “जर तुम्ही म्हणालात तर मी भारताचे सर्व परदेशी कर्ज फेडू शकतो आणि त्या बदल्यात मी परदेशी लोकांना भारताचा कर्जदार बनवू शकतो!”त्यांचे बोलणे ऐकून लोकही थक्क झाले होते.
तुरुंगातून 8 वेळा पळून जाण्यात यशस्वी
नटवरलालने बनावट चेक आणि डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून अनेक दुकानदारांना लाखो रुपयांचा गंडा घातला. 70, 80 आणि 90 च्या दशकात त्यांचे नाव देशभरात कुप्रसिद्ध झाले. त्याच्यावर 100 हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल होते आणि देशातील 8 राज्यांची पोलीस त्यांच्या मागावर होती.
त्याला अनेकदा पोलिसांनी पकडलं असेल पण चक्क तुरुंगातूनही 8 वेळा पळून जाण्यात तो यशस्वी झाला होता. त्यामुळे पोलिसही हैराण झाले होते. अखेर पुन्हा एकदा जेव्हा हा ठग पोलिसांच्या ताब्यात आला तेव्हा मात्र पोलिसांनी तो सहजासहजी सुटणार नाही याचा पूर्ण बंदोबस्त केला. त्यानंतर त्याला एवढ्या गुन्ह्यांबद्दल 20 वर्षांचा तुरुंगवास झाला.