विमानवाहू युद्धनौका विक्रांतवरून पहिल्यांदाच नौदलाच्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टने घेतले उड्डाण

भारतीय नौदलाच्या लाइट कॉम्बॅट फायटर एअरक्राफ्टनी ( एलसीए ) युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या डेकवरून उड्डाण घेतल्याने हे केवळ तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक असले तरी ही मोठी झेप मानली जात आहे.

विमानवाहू युद्धनौका विक्रांतवरून पहिल्यांदाच नौदलाच्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टने घेतले उड्डाण
INSVIKRANT2Image Credit source: INSVIKRANT2
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 9:00 PM

मुंबई : गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात नौदलात सामील झालेल्या भारताची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या डेकवरून नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या लाइट कॉम्बॅट फायटर एअरक्राफ्टनी (LCA) सोमवारी प्रथमच यशस्वी टेक ऑफ आणि लँडींग केले आहे. या घटनेमुळे आता एअरक्राफ्ट कॅरीयरसह एअरक्राफ्ट फायटरचे डीझाईन, विकास, बांधणी आणि वापर करण्याची भारताची क्षमता असल्याचे जगाला कळले असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ठ केले आहे.

भारतीय नौदलाच्या लाइट कॉम्बॅट फायटर एअरक्राफ्टचे हे ( एलसीए ) केवळ तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक असले तरी ही मोठी झेप आहे. कारण भारताने डेक-आधारित फायटर ऑपरेशन्ससाठी विशिष्ट तंत्रज्ञान विकसित केले आहे आणि पुढे दुहेरी-इंजिन डेक-आधारित फायटर विकसित करण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.

विक्रांत जहाजावर एकूण बारा MIG-29K लढाऊ विमाने तैनात करण्यात येणार आहेत. आणि थोड्याच दिवसात दुहेरी इंजिनाच्या फायटर जेट विक्रांत नौकेवरून आकाशात झेपावण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले जाणार आहे. नेव्हीच्या विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य वरही MIG-29K लढाऊ विमाने उड्डाणे घेण्याची क्षमता आहे.

आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर एलसीए फायटर विमानांनी ऑगस्ट 2020  मध्ये प्रथम उड्डाण घेतले होते. INS विक्रांत युद्धनौकेवरून डबल इंजिनाची फायटर विमाने झेप घेण्याची क्षमता प्राप्त झाल्यावर भारताने युद्धनौकेच्या डेक-वरून उडू शकणाऱ्या 26 नवीन फ्रेंच राफेल एम फायटर अथवा अमेरिकन F/A-18 सुपर हॉर्नेट विमानांच्या खरेदीची योजना आखली आहे. राफेलची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनने केली आहे. तर F/A-18 सुपर हॉर्नेट हे बोइंगचे उत्पादन आहे.

विक्रांतवर कामोव्ह-31, MH-60R मल्टी-रोल हेलिकॉप्टर, स्वदेशी बनावटीची प्रगत हलकी हेलिकॉप्टर (ALH) आणि लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) यांचा समावेश असलेली 30 विमाने असणार आहेत.  STOBAR (शॉर्ट टेक-ऑफ बट अरेस्टेड लँडिंग) या नावाने ओळखल्या जाणार्‍या नवीन एअरक्राफ्ट-ऑपरेशन मोडचा वापर करून, IAC विमान सुरू करण्यासाठी स्की-जंप आणि जहाजावर त्यांच्या पुनर्प्राप्तीसाठी ‘अरेस्टर वायर्स’सह सुसज्ज आहे. देशातच तयार करण्यात आलेल्या या जहाजामूळे अशी जहाज बांधणीची क्षमता असणाऱ्या अमेरीका, इंग्लंड, रशिया, फ्रान्स आणि चीन या देशांच्या यादीत भारत जाऊन पोहचला आहे.

आयएनएस विक्रांत तब्बल 262  मीटर लांब आणि 14 मजली उंच आहे. विक्रांतवर 35 पेक्षा जास्त मिग-29 लढाऊ विमाने, विविध हेलिकॉप्टर तैनात असणार आहे. आयएनएस विक्रांत’च्या उभारणीचा खर्च तब्बल 20 हजार कोटींपेक्षा जास्त आला आहे. या जहाजाचे वजन 45 हजार टन असून एका दमात 15 हजार किलोमीटर एवढा पल्ला पार क्षमता या जहाजाची आहे. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेने नौदलाची  1961 ते 1997 सेवा केल्यानंतर तिच्या स्मरणार्थ ही नवीन आयएनएस विक्रांत देशात बांधण्यात आली.

भारतीय नौदलाची विक्रांत ही चौथी विमानवाहू युद्धनौका आहे. पहीली विक्रांत नौका ( ब्रिटीशनिर्मित ) 1961 ते 1997 सेवेत होती. नंतर आयएनएस विराट ( ब्रिटीशनिर्मित ) 1987 ते 2016 पर्यंत सेवेत होती. त्यानंतर आयएनएस  विक्रमादित्य 2013 पासून नौदलाची सेवा बजावत आहे. भारतीय नौदलाला आणखी एका विमानवाहू युद्धनौकेची गरज आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.