CRAMOSA: दिल्ली विमानतळावर समोसा खाताना लोकं म्हणताहेत, उठा ले देवा उठा ले….
समोशाची किंमत साधारणतः 5 ते 10 किंवा 15 रुपये एवढीच असते. परंतु क्रेमोसाची किंमत जाणून घेतल्याने लोक गोंधळले आहेत. त्यामुळे या समोश्याने किंमतीमुळे गोंधळ घातला आहेच शिपाय त्याच्या वेगळ्या स्टाईलमुळेही त्याने आता कहर केला आहे. त्याची किंमतीवरुन आता विनोदी पोस्ट व्हायरल होत आहेत.
नवी दिल्लीः देशाच्या कानाकोपऱ्यात विकले जाणारे आणि एक स्ट्रीट फूड म्हणून ओळखले जातो तो समोसा. देशातील असंख्य माणसांना हा समोसा (Samosa) आवडतो, म्हणून तो तेवढ्याच आवडीने खाल्लाही जातो. समोसा आता भारतातच मिळतो असं नाही तर पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळसह अनेक देशांमध्ये भारतीय (Indian) समोश्याची चव तुम्हाला चाखायला मिळते. कारण समोश्याची निर्मितीच भारतात झाली आहे. सगळ्यांना आवडण्या पाठीमागे त्याची दोन कारणं आहेत, एक तर तो दहा किंवा पंधरा रुपयाला मिळतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची चव अनेकांना आवडणारीही असते. दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) मिळणारा समोसा मात्र त्याची किंमत ऐकूनच तुमचं डोकं हलेल.
या समोश्याला बघून कोण नवा डाव म्हणतय तर कोणी डोकं धरलं, चला तुम्हाला त्या समोश्याची तुम्हाला चव चाखता येत नसली तरी आम्ही तुम्हाला तो आहे कसा आणि नवं व्हर्जन आहे कसं ते दाखवणार आहोत.
Utha le re deva, utha le ?♀️?♀️
— Shradha Agarwalla (@TheDessertCart1) April 14, 2022
अनेकांच्या घरात आता नाश्त्याला समोसे आणि त्याची चटणी मिळते. इतका तो भारतीय झाला आहे. काही कंपन्यांकडून आता तयार समोसा पॅकिंगमध्येही मिळतो आहे. म्हणून त्याची भारतात चलती आहे.
What pic.twitter.com/VlVnMwrrXa
— Priyal (@priyal) April 14, 2022
पण सध्या एका आगळ्या वेगळा समोसा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्याला CRAMOSA असे नाव देण्यात आले आहे. सामान्यतः समोसा त्रिकोणी असतो, हा क्रेमोसा पूर्णपणे वेगळ्या आकारात आणि स्टाईलमध्ये आहे. या समोश्याला पाहून अनेक जण आश्चर्यचकित होत आहेत.
What pic.twitter.com/VlVnMwrrXa
— Priyal (@priyal) April 14, 2022
सोशल मीडियावरुन व्हायरल झालेला CRAMOSA हा समोसा आता दिल्ली विमानतळावर विक्रीसाठी उपलब्ध आहे. आणि त्याची किंमत 170 रुपये ठेवण्यात आली आहे.
Hey bhagwaan pic.twitter.com/cF5ZdMEAPE
— P La (@Pankajj_La) April 14, 2022
किंमतीत तफावत
समोशाची किंमत साधारणतः 5 ते 10 किंवा 15 रुपये एवढीच असते. परंतु क्रेमोसाची किंमत जाणून घेतल्याने लोक गोंधळले आहेत. त्यामुळे या समोश्याने किंमतीमुळे गोंधळ घातला आहेच शिपाय त्याच्या वेगळ्या स्टाईलमुळेही त्याने आता कहर केला आहे. त्याची किंमतीवरुन आता विनोदी पोस्ट व्हायरल होत आहेत.
संबंधित बातम्या
Video : पक्ष्यांना ‘याड लागलं’, डोळ्याचं पारणं फेडणारा व्हीडिओ, एकदा बघाच…
Video : पोलिसाने वाचवले माकडाचे प्राण, स्थानिकांकडून कौतुक, व्हीडिओ व्हायरल…
VIDEO: जगात अशक्य असं काहीच नाही! या दिव्यांग व्यक्तीचा व्हिडीओ पाहा, त्याच्या जिद्दीला कराल सलाम