लग्नाच्या पहिल्या रात्रीचा रोमान्स, स्वतः केला व्हिडीओ शेअर, नेटकरी म्हणाले, अपडेट देत…
कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात लग्न हा एक मोठा निर्णय असतो, त्याने संपूर्ण आयुष्यचं बदलतं. लग्नानंतर पहिली रात्रही लोकांसाठी खूप खास असते. बहुतांश लोकांसाठी असे क्षण खूप प्रायव्हेट, खासगी असतात. पण काही लोक असेही असतात, जे त्यांची पर्सनल लाईफदेखील लोकांसमोर शो ऑफ करतात.
Couple Romance Video Viral : कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात लग्न हा एक मोठा निर्णय असतो, त्याने संपूर्ण आयुष्यचं बदलतं. लग्नानंतर पहिली रात्रही लोकांसाठी खूप खास असते. बहुतांश लोकांसाठी असे क्षण खूप प्रायव्हेट, खासगी असतात. पण काही लोक असेही असतात, जे त्यांची पर्सनल लाईफदेखील लोकांसमोर शो ऑफ करत असतात. अशाच एका कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या जोडप्याचं नुकतंच लग्न झालेलं दिसत आहे. ते त्याच पोशाखात आहेत. पण त्यांची ती कृती पाहून सोशल मीडियावर बरेच जण त्यांची टर उडवत आहेत. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्सही करत आहेत. हे प्रकरण नक्की आहे तरी काय, जाणून घेऊ.
पहिल्या रात्रीच्या व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नुकतंच लग्न झालेलं जोडपं पहिल्या रात्रीची तयारी करताना दिसत आहे. या व्हिडीओत त्या वधूने लाल रंगाचा सुंदर लेंहगा घातलाय तर मुलगाही शेरवानीमध्ये दिसतोय. त्यानंतर दोघांनाही मिठी मारतात आणि त्यानंतर वधू तिचे दागिने उतरवायला लागते. मात्र मागून तो मुलगा( वर) तिला किस करतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचं ट्विटर) वर हा व्हिडीओ @Toxicity____ नावाच्या एका अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून तो आत्तापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी तो शेअरही केलाय. हा व्हिडीओ पाहून काही लोक त्यावर प्रचंड संतापही व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे.
Puri Unboxing post karna tha 🤐 pic.twitter.com/i40KupAEwk
— Berlin (@Toxicity_______) November 27, 2023
लोकांनी केल्या कमेंट्स
वर नमूद केल्याप्रमाणे, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. काही लोकांनी त्या जोडप्याच्या या कृतीवर संताप व्यक् केला आहे. तर काही लोकं मात्र त्यांची टर उडवत आहेत. त्यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘मी ट्युटोरियल व्हिडिओसाठी एक्सायटेड आहे.’ तर एक युजर म्हणाला की, ‘आरशात एखादा गुप्त कॅमेरा लावल्यासारखं वाटतंय.’ आणि एका मुलाने तर कमेंट करत हद्दच केली, ‘भावा, पुढचे अपडेट देत रहा.’, असे त्याने लिहीलं आहे.