तो जे सांगतो ते खरंच ठरतं, कोरोनाची भविष्यवाणीही अचूक; आता 38 वर्षीय तरुणाची बाबा वेंगापेक्षाही खतरनाक भविष्यवाणी काय?

Nicolas Aujula Prediction For 2025 : निकोलस औजुला, त्याने कोरोनाची अचूनक भविष्य वाणी केली होती. अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप पुन्हा जिंकतील हेही त्याने सांगितलं होतं. त्याच निकोलसने आता एक महत्वाची भविष्यवाणी केली आहे, जी ऐकून बरेच जण हैराण झाले आहेत.

तो जे सांगतो ते खरंच ठरतं, कोरोनाची भविष्यवाणीही अचूक; आता 38 वर्षीय तरुणाची बाबा वेंगापेक्षाही खतरनाक भविष्यवाणी काय?
Nicolas Aujula
Follow us
| Updated on: Jan 09, 2025 | 3:32 PM

नववर्षाची सुरूवात कधीच झाली असून अनेक वोक अजूनही सेलिब्रेशनमध्ये गुंग आहेत. पण आपलं हे वर्ष कससं जाईल ? याची अनेकांना उत्सुकता आहे. जगासाठी हे वर्ष कसं असेल ? बाबा वेंगा यांनी तर 2025 मध्ये पृथ्वीवर विनाश होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पण आज आपण एका 38 वर्षीय व्यक्तीबद्दल जाणून आहोत, ज्याने आतापर्यंत जे काही भाकीत केलं ते खरं ठरलं. 2018 मध्ये कोरोना अर्थात कोविडसारखा भीषण आजार येणार असून, त्यामध्ये लाखो लोक मरणार आहेत, असं त्यानेच पहिल्यांदा सांगितलं होतं. आता त्याच व्यक्तीने 2025 बद्दल जी भविष्यवाणी केली आहे ते ऐकून तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल.

एका रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहणारा हिप्नोथेरपिस्ट निकोलस औजुलाने जगाबद्दल खतरनाक भविष्यवाणी केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, 2025 मध्ये तिसरं महायुद्ध होणं निश्चित आहे. हे एक असं वर्ष आहे जिथे जगात दयेचा अभाव असेल,  धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावावर लोक एकमेकांचा गळाही धरू शकतील, राजकीय हत्या होतील. वाईट गोष्टी आणि हिंसा पृथ्वीवर असेल. नवीन वर्षात लॅबमध्ये अवयवांची निर्मिती होईल, असा अंदाज निकोलस औजुला यांनी वर्तवला आहे.

अतिवृष्टी होईल, विनाशकारी पूर येईल. यामुळे लाखो घरांचे नुकसान होऊ शकतं, लाखो लोक बेघर होतील. समुद्राची पातळी झपाट्याने वाढते. त्यामुळे अनेक शहरे पाण्याखाली जातील. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारर यांना राजकीय पडझडीचा सामना करावा लागणार आहे. जगात महागाई झपाट्याने वाढेल. एवढेच नाही तर ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि हॅरी यांच्यात समेट होईल, असेही भविष्य वर्तवण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

काय-काय केली भविष्य वाणी ?

निकोलस औजुला असा दावा करतो की तो जेव्हा 17 वर्षांचा होता तेव्हापासून कोणीतरी त्याच्या स्वप्नात येतं आणि त्याला भविष्याबद्दल सांगितलं जातं. त्याने आतापर्यंत जी काही भविष्यवाणी केली आहे ती त्या स्वप्नावर आधारित आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण औजुला यांनी अमेरिकेच्या सर्वात मोठ्या घटनांपैकी असलेल्या, ब्लॅक लाइव्ह्स मॅटर, डोनाल्ड ट्रम्पचा विजय, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वाढ, नोट्रेडेम फायर, कोविड, रोबोट आर्मी याबद्दल अचूक भाकीत केले होते. ते सर्व आत्तापर्यंत खरं ठरलं आहे.

कधी आला चर्चेत ?

निकोलसच्या सांगण्यनुसार, तो जेव्हा पौगंडावस्थेत होता तेव्हा त्याला समजले की त्याच्याकडे अशी मानसिक क्षमता आहे. काही दिवस तो कोमात गेला. त्याला त्याच्या मागील जन्माची दृश्ये दिसू लागली.मला असे अनेक अनुभव आले, जे मला भविष्यवाणी करण्याची ताकद देतात,असे त्याने नमूद केले.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.