Nipah virus : निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक, या राज्यात 4 जणांना लागण, इतर राज्यांना सतर्कतेचा इशारा
कोरोना पेक्षाही घातक आजाराने भारतात शिरकाव केला आहे. त्या आजाराची चार लोकांना लागण झाली आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळे आरोग्य विभाग काळजी घेत आहे. इतर राज्यांना सुध्दा या आजाराचा धोका असल्याचं आरोग्य विभागाने जाहीर केलं आहे.
केरळ : केरळ (Keral) राज्यात पुन्हा एकदा संसर्गजन्य आजाराने डोकेवरती काढले आहे. त्या आजाराचं नाव निपाह (Nipah virus) असं आहे. सहा लोकांना त्या आजाराची लागण झाल्याचं ताजी माहिती आहे. त्याचबरोबर दोन लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. केरळ राज्यात अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार सुध्दा तिथल्या घडामोडीकडे लक्ष ठेवून आहे. हा व्हायरल नियंत्रणात आणण्यासाठी तिथली यंत्रणा काम करीत आहे. केरळ राज्याने लोकांच्या मदतीसाठी एक टीम तयार केली आहे. आईसीएमआर यांच्याकडून एक मोबाईल लॅब तयार करण्यात आली आहे. केरळ राज्यात (keral state) ग्रामीण भागात सुध्दा तपासणी करण्यात येत आहे. हा व्हायरल केरळ राज्यातून बाहेर जाऊ शकतो का ? त्याचबरोबर हा आजार कोरोनापेक्षा अधिक डेंजर असल्याचं सुध्दा म्हटलं जात आहे.
या राज्यांना दिला अलर्ट
केरळ राज्यात या आजाराला नियंत्रित करण्यासाठी सरकार विविध पध्दतीचे प्रयत्न करीत आहे. कारण त्या आजाराचे परिणाम दुसऱ्या राज्यावर होण्याचे संकेत अधिक आहेत. निपाह हा व्हायरल एकमेकांच्या संपर्काने पसरतो. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात हा आजार पसरण्याची शक्यता आहे. ICMR इतर राज्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. राजस्थान राज्याला सुध्दा अलर्ट देण्यात आला आहे.
२०१८ मध्ये १७ लोकांचा मृत्यू
कर्नाटक राज्यात सुध्दा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर परराज्यातून येणाऱ्या लोकांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. निपाह आजार कर्नाटक राज्यात येऊ नये, यासाठी तिथली यंत्रणा सर्वतोपरी पर्यत्न करीत आहे. २०१८ मध्ये १७ लोकांचा मृत्यू झाला होता.
या दोन राज्यांना अधिक धोका
निपाह आजारामुळे ३० ऑगस्टला मृत्यू झाला होता. त्याचं कारण आता समजलं आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत सहा लोकांची ओळख पटली आहे. २५० लोकांना लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १२ लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यातं आलं आहे. रुग्ण डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्याला अधिक धोका आहे.