Vedic Paint | शेणा-मातीच्या काल्याला आधुनिक टच, गडकरींच्या हस्ते वैदिक रंगाचं लाँचिंग

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari launching vedik paint) यांच्या हस्ते आज वैदिक रंगाचं लाँचिंग होत आहे. 

Vedic Paint | शेणा-मातीच्या काल्याला आधुनिक टच, गडकरींच्या हस्ते वैदिक रंगाचं लाँचिंग
वैदिक पेंट
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 11:12 AM

नवी दिल्ली : पूर्वी घरांच्या भिंतींना शेणा-मातीच्या काल्याने सजवलं जात होतं. आधुनिक काळात शेणा-मातीची (Gobar se Dhan) जागा डिस्पेंटर, इमल्शन आणि प्लास्टिक रंगांनी घेतली. मात्र आता खादी आणि ग्रामीण उद्योग आयोगाने पुन्हा जुनं सोनं परत आणलं आहे. गाईच्या शेणापासून बनवण्यात येणारा वैदिक रंग (Vedic Paint) लाँच करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari launching vedik paint) यांच्या हस्ते आज वैदिक रंगाचं लाँचिंग होत आहे.  पर्यावरणपूरक या रंगाचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी महत्त्वाचा फायदा म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. खादी आणि ग्रामीण उद्योग आयोग (Khadi and Village Industries Commission) हा रंग लाँच करत आहे.

हा रंग डिस्टेंपर आणि इमल्शन यामध्ये उपलब्ध होणार आहे. (Khadi Prakritik Paint) हा रंग इको फ्रेंडली, नॉन टॉक्सिक, अँटी बॅक्टिरिअल, अँटी फंगल आणि वॉशेबल असेल. विशेष म्हणजे हा रंग वाळण्यासाठी फक्त चार तास लागतात. यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी 55 हजारांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल असा दावा करण्यात येत आहे.

खादी इंडियाचा हा नैसर्गिक रंग शेणापासून बनला आहे. मात्र त्याचा अजिबात दुर्गंध येत नाही. हा रंग गंधहीन आहेच, शिवाय यामध्ये कोणत्याही रसायनांचा वापर केलेला नाही. शेणापासून बनल्यामुळे हा अँटी व्हायरल आहे. या रंगाचे वैशिष्ट्यं म्हणजे हा रंग इको फ्रेंडली, नॉन टॉक्सिक, अँटी बॅक्टिरिअल, अँटी फंगल आणि वॉशेबल आहे. हा रंग नैसर्गिक रंगद्रव्ये आणि मिश्रण मिळून तयार करता येणार आहे. यात आवश्यकेनुसार वेगवेगळे रंग मिसळता येऊ शकतात.

BIS मानकांचा शिक्का

भारतीय मानक ब्युरोने वैदिक पेंटला प्रमाणित केलं आहे. या रंगाचं परीक्षण देशातील तीन मोठ्या प्रयोगशाळा नॅशनल टेस्ट हाऊस मुंबई, गाझियाबाद आणि श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल रिसर्च नवी दिल्ली इथं करण्यात आलं आहे.

हा रंग कसा तयार केला?

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने ‘खादी वैदिक पेंट’ची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडली. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हा मोठा पर्याय असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे चेअरमन विनयकुमार सक्सेना यांनी मार्च 2020 मध्ये हा प्रकल्प हाती घेतला. त्यानंतर जयपूरमधील कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूटने हे विकसित केलं.

2 ते 30 लिटरमध्ये उपलब्ध

सध्या हा रंग 2 लीटरपासून 30 लीटरपर्यंत डब्ब्यात पॅकिंग करण्यात आला आहे. गायीच्या शेणापासून बनवण्यात आलेला हा रंग म्हणजे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे बोललं जात आहे. यामुळे गोशाळांचे उत्पन्न वाढेल. त्यासोबतच कोरोना काळात एक नवा उद्योगही तयार होईल. (Central Government Launching Cow Dung-based Vedic Paint)

ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती

भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळावे यासाठी Khadi and Village Industries Commission च्या माध्यमातून हा नवा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला गायीच्या शेणापासून बनवण्यात आलेला वैदिक रंग वापरता येणार आहे.

संबंधित बातम्या 

Vedic Paint | गायीच्या शेणापासून वैदिक रंगाची निर्मिती, वैशिष्ट्यं काय?

(Nitin Gadkari launching vedik paint)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.