Nose Only Mask | फक्त नाकाला झाकणारा ‘हा’ मास्क ठऱतोय जगभरात चर्चेचा विषय, जाणून घ्या नेमके वैशिष्ट्य काय?

मेक्सिकोमध्ये फक्त नाकाला झाकणारे मास्क तयार करण्यात आले आहे. या मास्कमुळे कोरोना विषाणूला थांबवण्यास मदत होते असे म्हटले जात आहे. (only nose mask all information)

Nose Only Mask | फक्त नाकाला झाकणारा 'हा' मास्क ठऱतोय जगभरात चर्चेचा विषय, जाणून घ्या नेमके वैशिष्ट्य काय?
ONLY NOSE MASK-
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 11:37 PM

मेक्सिको : कोरोनाने जगभरात हाहा:कार माजवला आहे. कोरोना संसर्गाला थोपवण्यासाठी अनेक देशात विविध उपायोजना केल्या जात आहेत. रोज नवनवे संशोधन केले जात आहे. दिवसरात्र मेहनत करुन जगातल्या संशोधकांनी अनेक कोरोना प्रतिबंधक लसी निर्माण केल्या आहेत. कोरोना संशोधनात कितीजरी प्रगती झाली, तरी मास्क वापरण्याचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही. कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी चेहऱ्याला मास्क लावणे हा प्रभावी उपाय मानला जातो. त्यामुळे आता मास्कमध्येसुद्धा अनेक संशोधनं केली जात आहेत. मेक्सिकोमध्ये फक्त नाकाला झाकणारे मास्क तयार करण्यात आले आहे. या मास्कमुळे कोरोना विषाणूला थांबवण्यास मदत होते असे म्हटले जात आहे. या मास्कला नोज ओन्ली मास्क (Nose Only Mask) म्हटलं जातंय. (only nose mask launched easy for eating and water drinking all information of only nose mask)

ओन्ली नोज मास्क काय आहे?

मेक्सिको येथील संशोधकांनी कोरोनाला थोपवण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा मास्क मास्क तयार केला आहे. या मास्कचे वैशिष्ट्य असे आहे की, हा मास्क फक्त आपल्या नाकाला कव्हर करतो. फक्त नाकालाचं कव्हर करत असल्यामुळे या मास्कला नोज ओन्ली मास्क म्हणतात. या मास्कची सगळीकडे जोरदार चर्चा होत असली तरी हे मास्क फक्त नाकालाच कव्हर करत असल्यामुळे त्याच्या परिणामकतेबाबत शंका उपस्थित केली जात आहे. कोरोनाचा विषाणू फक्त नाकावाटेच जातो असं नाही. तर विषाणू आपल्या तोंडाच्या माध्यमातूनसुद्धा शरीरात जाऊ शकतो. त्यामुळे या मास्कच्या परिणामकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

ओन्ली नोज मास्कचे वैशिष्ट्य काय आहे?

नोज ओन्ली मास्कची माहिती देणारा एक व्हिडीओ रॉयटर्स या वृत्तसंस्थेने अपलोड केला आहे. या व्हिडीओत काही लोक नाकावर नोज ओन्ली मास्क घातल्याचे दिसत आहे. आपण सामान्य मास्क घातल्यामुळे जेवण करताना, पाणी पिताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, ओन्ली नोज मास्क फक्त नाकावर असल्यामुळे आपले तोंड खुले राहते. परिणामी आपल्याला जेवण करताना, पाणी पिताना वेळोवेळी मास्क काढण्याची गरज नाही. नोज ओन्ली मास्कच्या वर आपण नॉर्मल मास्कसुद्धा वापरू शकतो. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही गोष्टीचा वास घेण्यासाठी मदत करणाऱ्या ज्या पेशी आहेत, त्यासुद्धा कोरोना संसर्गाचे माध्यम होऊ शकतात. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखायचा असेल तर प्राधान्याने नाकाला झाकणे गरजेचे आहे.

दरम्यान, नोज ओन्ली मास्क या नव्या प्रकारच्या मास्कची चर्चा जगभरात होत आहे. फोटोमध्ये पाहिल्याप्रमाणे फक्त नाकाला झाकलेले असल्यामुळे नोज ओन्ली मास्क हे विचित्र असल्यासारखे वाटत आहे. एखाद्या जोकरने नाकावर काहितरी लावावं त्याप्रमाणे नोज ओन्ली मास्क दिसत असल्याचे अनेकांनी म्हटलंय. मात्र, सुरुवातीला मास्क घालणे आपल्याला विचित्र वाटत होते. पण नंतर आपल्या सर्वांना त्याची सवय लागली. त्यामुळे आगामी काळात नोज ओन्ली मास्कची सुद्धा आपल्याला सवय लागेल असा दावा अनेकांनी केला आहे.

इतर बातम्या :

India Corona Update : एप्रिल-मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट जोरात, 100 दिवस सावधगिरी बाळगण्याची गरज!

(only nose mask launched easy for eating and water drinking all information of only nose mask)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.