एटीएममध्ये तांत्रिक बिघाड, एका व्यक्तीने 5 महिन्यांत त्यांनी 9 कोटींहून अधिक रोकड काढली, मग…
एकाने व्यक्ती चतुरपणा दाखवत 5 महिन्यांत त्यांनी 9 कोटींहून अधिक काढली आहे. विशेष म्हणजे एटीएममध्ये बिघाड झाल्यामुळे हा सगळा प्रकार झाला असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
मुंबई : एका व्यक्तीने त्याच्याकडे असलेला चतुरपणा दाखवत एटीएममधून (ATM) पैसे काढले आहेत. त्याने असंख्यवेळा पैसे काढले आहेत. त्या एटीएमला तांत्रिक (Technical issue) अडचण झाली होती, त्याचा फायदा त्या व्यक्तीने घेतला आहे. विशेष म्हणजे 9 कोटींहून अधिक काढल्यामुळे त्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे. त्या व्यक्तीने मागच्या पाच महिन्यात ही रक्कम काढली आहे. त्याने ते पैसे काढल्यानंतर खूप सारी मजा केली आहे. त्या व्यक्तीने कसे पैसे काढले किंवा काढलेल्या पैशाचं काय केलं हे त्याने मीडियाला (National Australia Bank) सांगितलं आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला तरुंगात पाठवण्यात आलं आहे. हे प्रकरण परदेशातील आहे.
द सन च्या माहितीनुसार डैन सांडर्स नावाच्या एका व्यक्तीने ही संपूर्ण माहिती मीडियाला सांगितली आहे. २०११ मध्ये तो त्याच्या मित्रांसोबत एका ठिकाणी पार्टीसाठी गेला होता. National Australia Bank च्या एटीएममधून १० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी त्याच्या खात्यात १० हजार रुपये सुध्दा नव्हते. त्यावेळी त्याचा व्यवहार रद्द झाला.
त्यावेळी त्या व्यक्तीने क्रेडीट खात्यातून डेबिट खात्यात पैसे पाठवले. त्यावेळी ही प्रक्रिया झाली नाही. त्यानंतर वारंवार प्रयत्न केले, अधिक प्रयत्न केल्यानंतर त्याला रोकड मिळाली. एटीएम मशीनमध्ये ज्यावेळी व्यवहार बंद होतात, त्यावेळी रक्कम निघत असल्याचे पाहून त्या व्यक्तीला धक्का बसला. त्यानंतर त्याने दोन-तीनवेळा प्रयत्न केला. ज्यावेळी तो प्रयत्न करायचा त्यावेळी त्याला पैसे मिळायचे. त्याच्या खात्यातून अजिबात पैसे कापले जात नव्हते.
पाच महिन्यात त्या तरुणांने अनेक अशा पद्धतीने पैसे काढले आहेत. ९ करोड रुपयांचा आकडा पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
तो रात्री १२ ते २ वाजता अशा पद्धतीचं काम करायचा. रात्री १२ ते वाजेपर्यंत बँकेचं नेट बंद असतं. त्याचवेळी मोका मिळेल तिथं तो पाहिजे तेवढे पैसे काढायचा. त्याचबरोबर तो बँकेत फोन करुन विचारायचा सुध्दा की बँकेत काही गडबड तर नाही. ज्यावेळी बँक सांगायची कसलीचं गडबड नाही, त्यावेळी हा पुन्हा पैसे काढायचा.
त्याने स्वत: मजा घेतली, त्याचबरोबर…
त्या व्यक्तीने पैसे काढून स्वत: मजा घेतली. त्याचबरोबर मित्रांना सुध्दा पार्टी दिली. तो खासगी विमानानं फिरायचा. पबमध्ये दारु प्यायला जायचा. महागड्या हॉटेलमध्ये जेवण करायचा. त्याने आपल्या मित्रांची सुध्दा बिलं भरली आहेत. काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे दिले आहेत. त्यावेळी तो फक्त २९ वर्षाचा होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तो जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा नोकरी करु लागला.