नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : साठीनंतर बुद्धी नाठी म्हणतात. साठव्या वयानंतर सर्वसाधारण लोक चारधाम तीर्थयात्रा वगैरेची तयारी करीत असतो. नातलगांना खेळवू लागतो. पुरुष असो वा महिला सर्वजण 60 व्या वर्षांनंतर आराम खुर्ची पसंत करीत असतो. परंतू काही लोक साठीनंतर हाती काठी न घेता असं काही आक्रीत करतात की तरणीताठी मंडळीही अवाक होऊन पाहात राहतात. आता एका 66 वर्षांच्या आजीने मोपेडवरुन तब्बल सहाशे किमीचा प्रवास केल्याने सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
मध्य प्रदेशातील नीमच येथे रहाणारी 66 वर्षांच्या सोहनबाई यांनी अशी कमाल केली आहे की तरुणमंडळी देखील हैराण होतील. या वयातही सोहनबाई मोठ्या जोशात लूना मोपेड चालवितात. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी लूना मोपेडवरुन 600 किमीचे अंतर कापले आहे. मध्यप्रदेशातील नीमच ते राजस्थानातील रामदेवरा पर्यंत त्यांनी प्रवास केला आहे. त्यांचा प्रवास गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. परंतू त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर आता व्हायरल होत आहे.
सोहनबाई या नीमच जिल्ह्याच्या मानसा तहसीलमध्ये रहातात. पूर्वी त्या लूनावरुन दूध विकण्याचे काम करायच्या. सोशल मिडीयावर त्यांचा व्हिडीओ roxstaraarya नावाच्या युजरने शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन लिहीली आहे की मध्य प्रदेशातील नीमच हून रामदेवरा 600 किमीपेक्षा जास्त प्रवास एकट्याने पूर्ण केला…जय बाबा रामदेव जी की…या व्हिडीओत आपण सोहनबाई मजेत डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या सोबत लोकही नाचत आहेत. तुम्ही पाहू शकता सोहनबाई आपली मोपेड स्टार्ट करतात आणि प्रवास सुरु करतात…
सोहनबाईचा हाच तो व्हिडीओ पाहा –
या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे. या ज्येष्ठ महिलेच्या उत्साहाला युजर कमेंट करून सलाम करीत आहेत. एका युजरने लिहीलेय की या आमचे शहक मनासाच्या आहेत. जे नीमच जवळ आहे. आणि ही आजी गेल्या सात वर्षांपासून बाबा रामदेवजी जत्रेला जातात. दुसऱ्या एका युजरने लिहीलेय की दबंग दादी ! या व्हिडीओबद्दल तुमचे काय कमेंट आहे.