नशीबानं रडवलं, आजींनी भर पावसात जगायला शिकवलं, पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एक आज्जी भर पावसात भाजी विकताना दिसत आहे, हा व्हिडीओ अनेकांसाठी प्रेरनादायी ठरला आहे.

नशीबानं रडवलं, आजींनी भर पावसात जगायला शिकवलं, पाहा व्हिडिओ
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 8:01 PM

साधा स्मार्टफोनचा रिचार्ज संपला की तरुण मंडळींची घरात आरडाओरड सुरु होते, साखर शेंगदाने संपले की गृहिणींना टेन्शन येतं, प्रौढांचं तर प्रत्येक साध्या साध्या गोष्टीत टेन्शन असतं. या सर्व वयोगातील लोकांना एका आजींच्या हिमतीचा व्हिडिओ दाखवायला हवा. या आजींना नशीबाने साथ दिली नाही, वरुणराजानेही छळलं पण आजींनी परिस्थितीला कडव आव्हान देत आपलं काम सुरु ठेवलं.

असं म्हणतात की, गरिबीला कशाचीही पर्वा नसते. गरिबीला ना मानवी सक्ती समजते ना वय. ज्या वयात आधार हवा असतो, चालणेही कठीण होते, त्या वयातही अनेकांना पोटासाठी मेहनत करावी लागते. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक वृद्धा आजी रस्त्यावर पावसात भाजी विकताना दिसत आहे. हे पाहिल्यानंतर नैराश्य म्हणजे काय हेही विसरून जाल.

व्हिडिओत नेमके काय?

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आजी मुसळधार पावसात रस्त्याच्या कडेला फूटपाथवर दुकान थाटताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही वृद्धा पावसात फक्त 1 छत्री घेऊन भाजी विकत आहे. व्हिडिओ पाहिला तर समजेल की, ही परिस्थिती सोपी नाही, पण वृद्धेच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू दिसत आहे. विशेष म्हणजे सुमारे 13 सेकंदाच्या या क्लिपमध्ये आजी कॅमेऱ्यात रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीशी बोलताना दिसत आहे.

हा व्हिडिओ इन्स्टावर @_pratimapramanick_12 नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. हा व्हिडिओ आता कोट्यवधी लोकांनी पाहिला असेल. एका युजरने लिहिलं, ‘माझी इच्छा आहे की मला या आईला जमेल तितकी मदत करण्याची संधी मिळावी.’ तर दुसऱ्याने लिहिलं, ‘खूप छान, जोपर्यंत हातपाय धावत आहेत, तोपर्यंत आजी स्वत: कमावत आहे आणि लोकांकडून भीक मागत नाही.’

अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये आल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यावर नैराश्येत असलेले देखील उमेदीने कामाला लागतील. साध्या साध्या गोष्टींचं टेन्शन घेणारे देखील समजूतदार होतील.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.