Video : खाद्यपदार्थांवरचे प्रयोग काही थांबेना! आता Omeletteची ‘ही’ नवी Recipe होतेय Viral
Weired food : खाद्यपदार्थांवर आजकाल प्रयोग (Experiment) करण्याची स्पर्धाच लागली आहे. आता एखाद्या पदार्थावर प्रयोग करण्याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. पापडवाला ऑम्लेट (Papad omlette). खवय्यांना हे प्रचंड आवडत असल्याचे तो विक्रेता सांगत आहे.
Weired food : खाद्यपदार्थांवर आजकाल प्रयोग (Experiment) करण्याची स्पर्धाच लागली आहे. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे तर यात फारच पुढे आहेत. कधी कोणी पाणीपुरी शेक बनवत आहे, तर कोणी मोतीचूर लाडूचा शेक तर कोणी 40 अंडी (Eggs) एकत्र करून त्याचे ऑम्लेट बनवत आहे. आपल्याकडे अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी हे प्रयोग होत आहेत. यूझर्स असे व्हिडिओ पाहतात, मात्र हे पदार्थ ट्राय करत नाहीत. कारण व्हिडिओवरच्या कमेंट्स पाहिल्या तर लोकांना असे पदार्थ आवडत नाहीत, असेच दिसते. आता एखाद्या पदार्थावर प्रयोग करण्याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. पापडवाला ऑम्लेट (Papad omelette). होय. अलिकडे ऑम्लेट या पदार्थावर जरा जास्तच प्रयोग होत आहेत. विशेष म्हणजे हा नवा पदार्थ खवय्यांना प्रचंड आवडत असल्याचे तो विक्रेता सांगत आहे.
दोन अंड्यांचे ऑम्लेट
व्हिडिओत आपण पाहू शकतो, की तो विक्रेता आपल्या पापड ऑम्लेट या रेसिपीविषयी सांगत आहे. पहिल्यांदा तो बटरमध्ये पापडाला फ्राय करतो. नंतर तो बाजूला ठेवून पॅनमध्ये पुन्हा बटर टाकतो. दुसऱ्या पॅनमध्ये दोन अंडी आणि त्यात सर्व मसाले टाकतो ते फेटून या बटरमध्ये टाकतो. ऑम्लेट झाल्यानंतर त्यावर आधी फ्राय केलेला पापड टाकतो आणि त्यावर पुन्हा बटर, टोमॅटो असे पदार्थ टाकून सजवतो. हा पदार्थ जास्त करून पंजाबी लोक आवडीने खातात, असे त्या विक्रेत्याचे म्हणणे आहे.
यूट्यूबवर अपलोड
यूट्यूबवर आर यू हंग्री (ARE YOU HUNGRY) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 11 मार्चला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. ‘INDIA’S FIRST पापड़ wala Omlette’, ये क्या बना दिया अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलीय. यावरूनच हा पदार्थ कसा असेल, हे लक्षात येते. यूझर्सनी कमेंट्सही मजेशीर केल्या आहेत.