सोशल मीडियावर मॅगीचं बिल व्हायरल, 193 रुपयांचं बिल पाहून लोकं म्हणाले…

| Updated on: Jul 18, 2023 | 10:36 AM

एका महिलेने मॅगी खाल्ली ज्यावेळी तिच्या हातात बिल देण्यात आलं त्यावेळी ती सुध्दा एकदम शॉक झाली. त्या महिलेचं बील सोशल मीडियावर अधिक व्हायरल झालं आहे. त्या बिलावरती मॅगीचं बिल 193 रुपये आहे.

सोशल मीडियावर मॅगीचं बिल व्हायरल, 193 रुपयांचं बिल पाहून लोकं म्हणाले...
maggi masala
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मॅगी (maggi) तुम्ही सुध्दा खात असाल, खरतंर हे अगदी पटकन मिळणार फुड असल्यामुळे लोकांच्या अधिक पसंतीला पडलं आहे. ज्यावेळी लोकांना अधिक फास्ट जेवण करायचं आहे. त्यावेळी लोकं गरम पाणी करतात आणि त्यामध्ये मॅगी (maggi noodles) तयार करुन खातात. काही मिनिटात मॅगी खायला मिळते. असं म्हटलं जातं की मॅगी दोन मिनिटात तयार होते. एकवेळ अशी होती की, मॅगी १० रुपयाला मिळायची. त्यांच्यानंतर मॅगी १२ रुपयांना मिळू लागली. आता मॅगी १४ रुपयांना मिळत आहे. समजा त्याचं मॅगीसाठी (maggi noodles fast food) तुम्हाला दीडशे ते दोनशे रुपये द्यावे लागत असतील तर तुम्ही कराल ? ज्यावेळी त्या महिलेच्या हातात मॅगीचं बिल आलं त्यावेळी त्यांना सुध्दा धक्का बसला.

महिलेला 193 रुपये भरावे लागले

एका महिलेने एका विमानतळावर मॅगीचं एक पॉकेट खाल्लं त्यावेळी त्या महिलेला 193 रुपये भरावे लागले. त्याचं बिल सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल झालं आहे. बिल पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा धक्का बसेल. लोकांना त्या बिलावरती विश्वास बसत नाही, कारण ते बिल तितकं मोठं आहे. त्या बिलामध्ये मसाला मॅगीची किंमत 184 रुपये आहे. त्याचबरोबर त्या बिलासोबत जीएसटी जोडल्यामुळं ते बिल 193 रुपये झालं आहे. त्यानंतर त्या महिलेने युपीआयद्वारे पेमेंट केलं आहे. ज्यावेळी त्या महिलेच्या हातात बिल आलं, त्यावेळी त्यांनी त्याचा फोटो काढून शेअर केला.

हे सुद्धा वाचा

कोणी मॅगी इतक्या महाग का विकेल ?

त्या महिलेचं नाव सेजल सूद आहे. सेजल यांनी ते बिल ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की मी मॅगी 193 रुपयांना खरेदी केली आहे. मला नाही माहित की प्रतिक्रिया कशी द्यायची. कोणी मॅगी इतक्या महाग का विकेल ? हे बिल पाहून लोकं विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीनं सांगितलं की, जर त्याची किंमत इतकी जास्त होती. तर तुम्ही ती खरेदी का केली. त्याला उत्तर देताना सेजल म्हणाली की, ती दोन तासांपासून खायला शोधत होती. त्यामुळे त्यांना ते खरेदी करावं लागलं.