नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2023 : देशभर रक्षाबंधन साजरे केले जात आहे. बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधली. बहिणीने स्वतःच्या सुरक्षेचे वचन भावाकडून घेतले. परंतु, रायपूरच्या भावा-बहिणीची कहाणी हटके आहे. ही कहाणी वाचून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. गेल्या मे महिन्यापासून ४८ वर्षीय ओमप्रकाश धनगड किडनीच्या आजाराने त्रस्त होते. डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांची किडनी ८० ते ९० टक्के खराब झाली होती. आता जीवंत राहण्यासाठी त्यांना डायलीसीसचा सहारा घ्यावा लागणार होता. वेळ निघून गेली तशी त्यांची तब्बत आणखी खराब होत होती.
ओमप्रकाश यांच्या मुलांनी खूप विचार केला. गुजरातच्या नाडियाड रुग्णालयात किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला. डोनर कोण राहील याचा शोध सुरू झाला. ही बाब रायपूरच्या टिकरापारा येथे राहणाऱ्या बहिणीला माहीत झाली. ओमप्रकाशचे प्राण वाचवण्यासाठी त्यांची मोठी बहीण शीलाबाई तयार झाली.
गुजरातच्या रुग्णालयात किडनी डोनर म्हणून ओमप्रकाश यांची बहीण शीला या फीट होत्या. तीन सप्टेंबरला ऑपरेशनच्या माध्यमातून किडनी ट्रान्सप्लांट केली जाणार आहे. बहीण भावाला त्याच्या प्रकृतीसाठी मदत करत आहे. किडनी दान करून बहीण भावाचे प्राण वाचवणार आहे. रक्षाबंधनानिमित्त यापेक्षा मोठी भेट आणखी कोणती असू शकेल. या घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे.
ओमप्रकाश यांना किडनी दान करून त्यांची बहीण शीला भावाचे जीव वाचणार आहे. बहीण भावाच्या रक्षाबंधनाची ही कहाणी सामान्य व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. राखी हा बहीण-भावाच्या प्रेमाचा सण. ते एकदुसऱ्याला भेट देतात. छत्तीसगडमध्ये एक वेगळी घटना समोर आली. या रक्षाबंधनाची चर्चा सर्वत्र सुरू झाली. बहिणीने भावाला विशेष भेट दिली.