Optical Illusion : या फोटोमध्ये एकूण किती 8 आहेत ? भल्याभल्यांना सुटलं नाही कोडं, तुम्हाला जमतंय का बघा
ऑप्टिकल इल्यूजन म्हंटलं की बुद्धीचा कस लागतो. कारण त्यामुळे त्यातलं कोडं सोडवण्यासाठी प्रत्येक जण बारीक लक्ष ठेवून प्रयत्न करत असतो. असंच एक ऑप्टिकल इल्यूजन समोर आलं आहे.
मुंबई : सोशल मीडियावर रोजच घडामोडी घडत असतात. स्मार्टफोनमुळे सोशल मीडिया हाताळणं सोपं झालं आहे. त्यामुळे रोजच्या घडामोडींकडे युजर्सचं बारीक लक्ष असतं. आसपास घडत असलेल्या घटनांचा आढावा घेत असताना विरंगुळा म्हणून ऑप्टिकल इल्यूजनकडे पाहिलं जातं. ऑप्टिकल इल्यूजनमुळे बुद्धीचा चांगलाच कस लागतो. असंच डोकं चक्रावून टाकणारी ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हीही चक्रावून जाल यात शंका नाही. कारण फोटो आणि त्याबाबत विचारलेला प्रश्न बुचकळ्यात टाकणारा आहे. फोटोमध्ये एकूण किती 8 आहेत असं विचारण्यात आलं आहे. त्यामुळे या फोटोत 8 संख्या शोधण्यासाठी बुद्धीचा कस लागला आहे. या फोटोत 8 या संख्येची मांडणी अशा पद्धतीने केली आहे की, जिथे पाहावं तिथे 8 ही संख्या दिसतात.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोखाली 4, 5, 7, 9 असे पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे इतकेच आठ असावेत हे डोक्यात ठेवून शोधाशोध सुरु झाली आहे. पहिल्यांदा पाहिलं तर 8 किती वेळा लिहिलं गेला आहे, ते सांगणं कठीण आहे. पहिल्या नजरेत 8 ही संख्या चारवेळा लिहिल्याचं दिसून येतं. पण इतक्यावरच थांबू नका. कारण ते ऑप्टिकल इल्यूजन आहे. इतक्या सोप्या पद्धतीने उत्तर मिळणार नाही.
View this post on Instagram
चार आठ कुठे कुठे जोडले गेले आहेत ते पाहा. त्यावरून आता चारच्या पुढे आठ शोधण्यास सुरुवात करा. मधल्यामधे तुम्हाला आणखी काही 8 दिसून येतील. आडवे उभे असे 8 मोजा. इतकं सांगूनही अनेक युजर्स चुका करत आहेत. काही जण 5 तर काही जण 7 हे उत्तर देत आहेत.
इतकं सांगूनही तुम्हाला योग्य उत्तर सापडलं नसेल तर आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो. या फोटोत एकूण नऊ वेळा 8 ही संख्या लिहिली आहे. प्रथमदर्शनी तुम्हाला 4 आठ दिसले होते. आता डाव्या बाजूला या. पहिल्या रांगेत आडवे आणखी दोन 8 दिसतील. त्यानंतर दुसऱ्या रांगेत पुन्हा दोन 8 दिसतील. आता उभ्या रांगेत तुम्हाला मधोमध एक 8 दिसतील. तुम्हीही तुमच्या बुद्धीचा कस लावून योग्य उत्तर शोधलं असेल तर तुमचं अभिनंदन.