मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एकप्रकारचे कोडे असते. लहानपणापासून आपण कोडे सोडवत आलेलो आहे. ऑप्टिकल इल्युजन हा ऑनलाइन कोड्याचा प्रकार आहे. यात अनेक प्रकार असतात. कधी आपल्याला यात लपलेल्या गोष्टी शोधून काढायच्या असतात तर कधी चित्रांमधील फरक शोधायचा असतो. कधी कधी यात चुकलेलं स्पेलिंग शोधायचं असतं. अनेक प्रकार असतात पण यावर मार्ग एकच असतो, उत्तम निरीक्षण कौशल्य! या प्रकारची कोडी सोडवायला तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं असायला हवं. मन एकाग्र ठेऊन नीट निरखून पाहिलं तर तुम्हाला याचं उत्तर सापडेल. ऑप्टिकल इल्युजन खूप किचकट असतात. आता या चित्राकडे बघा आणि याचंही उत्तर लवकरात लवकर शोधून दाखवा.
हे चित्र बघा, या चित्रात तुम्हाला 23 हा आकडा शोधून दाखवायचा आहे. या कोड्याचं उत्तर शोधताना तुम्हाला तुमचं मन शांत ठेवावं लागेल. एक-एक ओळ नीट बघा, डावीकडून उजवीकडे, वरून-खाली, वेगात जर तुम्ही एक-एक अंक पाहिला तर तुम्हाला हा नंबर नक्कीच सापडेल. अभ्यासकांच्या मते ऑप्टिकल भ्रम व्यक्तीच्या स्वभावाबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात. ज्याला कुणाला याचं उत्तर लवकरात लवकर सापडतं तोच खरा हुशार म्हटला जातो.
आता याचं उत्तर तुम्हाला सापडलंय का? मोजून दहा सेकंदात तुम्हाला हे उत्तर शोधायचं आहे. आम्ही सांगतो उत्तर कसं शोधायचं, डोळे मिटा, मन शांत करा, एकाग्र व्हा आणि आधी मनात विचार करा की आपल्याला शोधायचं काय आहे? जे काही शोधायचं आहे ते आधी डोळ्यासमोर आणा. आपल्या डोक्यात जर क्लिअर असेल की आपल्याला शोधायचं काय आहे तर उत्तर शोधणे अधिक सोपे जाते. तुम्हाला आता तरी याचं उत्तर सापडलं आहे का? सापडलं असेल तर ठीक, नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.