चित्रात दडलेला हा चेहरा उघड करतोय आयुष्यातील गुपिते
Brilliant photo : ट्विटरवरती व्हायरल झालेल्या या पोस्टवरती लोकं विविध प्रकारच्या कमेंट करीत आहे. त्याचबरोबर ते चित्र आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे.
मुंबई : सगळे सांगत आहेत की, एक चित्र (Brilliant photo) काही गुपितं उघडी करु शकतात. सोशल मीडियावर (Social Media) असे फोटो कायम व्हायरल होत आहेत. त्याबरोबर असे फोटो लोकांना विचार करायला भाग पाडत आहेत. त्याचबरोबर काही फोटो असे असतात की, ते लोकांच्या बुध्दीची परीक्षा घेत असतात. एखादा फोटो लोकांना सारखा विचार करायला भाग पाडतो. काही फोटो वारंवार पाहिल्याने त्यामधून लोकांना काही गुपितं कळतात. सध्या जो फोटो व्हायरल (viral photo) झाला आहे. तो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्यावरती अनेक प्रतिक्रिया येत आहे. नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
तुम्ही त्या चित्राकडं नीट पाहा
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा फोटो व्हायरल झाला आहे. त्या फोटोमध्ये एक दुखी चेहरा दिसत आहे. तो चेहरा कुणाला घाणीमुळे परेशान असल्याचा दिसत आहे. तर काही लोकांना रस्त्यांच्या दुरावस्तेमुळे दुखी असल्याचा जाणवत आहे. आता आपल्याला हे पाहायचं आहे की, तुम्हाला या फोटोत काय दिसत आहे. नेटकऱ्यांना या फोटोमध्ये तिथली घाणं, पाणी रस्ता अशा गोष्टीमुळं तो चेहरा दुखी असल्याचं दिसलं आहे. तुम्ही समजा त्या फोटोकडे व्यवस्थित पाहिलं असेल, तर तुम्हाला सुध्दा त्यामध्ये एक चांगली गोष्ट नक्की दिसेल.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोला अनेकांनी AI च्या मदतीने तयार केल्याचं म्हटलं आहे. तर काही लोकं याला फोटोशॉप केल्याचं म्हणत आहे. चार दिवसांपुर्वी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला आतापर्यंत 2.6 मिलियन लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर 37 हजार लोकांनी या फोटोला लाईक सुध्दा केलं आहे.
हा फोटो शेअर करीत असताना एक कॅप्शन सुध्दा लिहीलं आहे. एक चांगला फोटो असं लिहीलं आहे. ज्या लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे, त्यांनी कमेंटमध्ये विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने या फोटोला ‘पेरिडोलिया’चं चांगलं उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. तुम्हाला हा फोटो कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.