Video: लाहौरच्या रस्त्यावर शहामृगाची रेस, नेटकरी म्हणाले, मी लोकलमधून उतरल्यावर असाच धावतो!

| Updated on: Oct 28, 2021 | 11:19 AM

लाहोरमधील एका महामार्गाच्या मध्यभागी एक शहामृग जोरात धावताना दिसला. होय, हे अगदी खरे आहे. याचा पुरावा तुम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता.

Video: लाहौरच्या रस्त्यावर शहामृगाची रेस, नेटकरी म्हणाले, मी लोकलमधून उतरल्यावर असाच धावतो!
लाहौरच्या रस्त्यावर शहामृग धावलं
Follow us on

सोशल मीडिया हे असा मंच आहे, जिथं तुम्ही काहीही पोस्ट केलंतरी ते व्हायरल होणं निश्चितच आहे. सोशल मीडियावर तुम्ही सर्वांनी प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. काही खूप गोंडस असतात तर काही असे असतात की, त्यांना पाहिल्यानंतर विश्वास ठेवणं थोडं कठीण होऊन बसतं. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक शहामृग दिसत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की शहामृग पाहणं ही काही मोठी गोष्ट नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो की हा शहामृग जंगलात किंवा कोणत्याही पक्ष्यांच्या अभयारण्यात नाही. तर तो पाकिस्तानची राजधानी लाहोरच्या रस्त्यावर धावताना दिसला. (Ostrich spotted running on Lahore street Video viral on social media watch here
)

लाहोरमधील एका महामार्गाच्या मध्यभागी एक शहामृग जोरात धावताना दिसला. होय, हे अगदी खरे आहे. याचा पुरावा तुम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता त्याच रस्त्यावर उपस्थित असलेल्या लोकांना खूप आश्चर्य वाटले आणि त्यांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. माहितीनुसार, ही घटना लाहोर कॅनाल रोडवर घडली.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडिओ आता 80,000 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि अनेक लोकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. लोक या व्हिडीओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. ‘ऑफिसला जाताना असं होतं’ असं लोक लिहितात, तर काही यूजर्सनं लिहिलं की, ‘ट्रेन सुटल्यावर मी असाच धावतो’ तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, ‘हा शहामृग पाहून अनेकजण नक्कीच आश्चर्यचकित होतील. तुम्हाला सांगतो की, व्हिडिओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एकत्र लोक इमोजी देखील शेअर करत आहेत.

हेही पाहा:

Video: सगळ्यांच्या नादी लागा, गेंड्याच्या नाही, प्रवाशांच्या जीप मागे धावणाऱ्या गेंड्याचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

Video: मृत्यूचा दाढेत फसला, लाथ मारुन बाहेर पडला, पोहणाऱ्यावरील मगरीच्या हल्ल्याच्या व्हिडीओ व्हायरल